Ticker

6/Breaking/ticker-posts

सभापती पदासाठी राष्टवादीकडून अविनाश घुले यांचा अर्ज दाखल

सभापती पदासाठी राष्टवादी कॉगेसकडून  नगरसेवक अविनाश घुले यांचा अर्ज दाखल (नगरसेवक अविनाश घुले यांनी स्थायी समिती सभापती पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला .  यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे  ,नगरसेवक गणेश भोसले ,संपत बारस्कर ,प्रकाश भागानगरे ,शेख मुद्सर ,मनोज दुलम ,धनंजय जाधव ,सचिन जाधव ,संजय चोपडा ,विनीत पाऊलबुध्ये ,सुनील त्रम्बके ,निखिल वारे ,सागर बोरुडे,बाळासाहेब पवार आदी ( फोटो - राजू खरपुडे ,नगर)


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर : - येत्या ४ मार्चला होत असलेल्या अहमदनगर मनपा स्थायी समितीच्या सभापती पदासाठी राष्टवादी कॉगेस पक्षाकडून नगरसेवक अविनाश घुले यांची उमेदवारी फायनल झाली असून त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला .

गेले महिनाभरापासून स्थायी समिती सभापती पदासाठी जोरदार मोचे बांधणी करण्यात येत होती . सताधारी भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षाकडून यावर चर्चा बैठका सुरु होत्या . या काळात अनेक नावेही चर्चेत आली मात्र राष्ट्रवादीकडून घुले हेच उमेदवारीचे प्रबळ दावेदार होते . अपेक्षेप्रमाणे त्यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले. एकच दिवस शिल्लक राहिला असून आता भाजपाकडून कोणाला उमेदवारी मिळते याची उत्सुकता आहे .

नगरसेवक अविनाश घुले यांनी स्थायी समिती सभापती पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला .  यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे  ,नगरसेवक गणेश भोसले ,संपत बारस्कर ,प्रकाश भागानगरे ,शेख मुद्सर ,मनोज दुलम ,धनंजय जाधव ,सचिन जाधव ,संजय चोपडा ,विनीत पाऊलबुध्ये ,सुनील त्रम्बके ,निखिल वारे ,सागर बोरुडे,बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते .

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या