Ticker

6/Breaking/ticker-posts

राणेगाव येथील १०० केव्हीचा ट्रान्सफार्मर तात्काळ जोडून देण्यात यावा - जिप.सदस्या हर्षदाताई काकडे


लोकनेता न्यूज

 ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 अहमदनगर :-शेवगाव तालुक्यातील  मौजे राणे गाव येथील कोकणे वस्ती येथील शेतकऱ्याला नवीन 100  केव्हीचा ट्रांसफार्मर  देण्यात यावा अशी मागणी  आणि जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अरविंद एस कुकडे यांच्याकडे केली.

दिलेल्या निवेदनात हर्षदा ताई काकडे म्हणाल्या की शेवगाव तालुक्यातील मौजे राणेगाव येथील टोणपे वस्ती येथील शेतकऱ्यांना गावातून बॅदवस्ती डी.पी.वरून शेतीसाठी वीज पुरवठा केला जातो . बेंद वस्तीवरील डी.पी.चा ट्रान्सफार्मर हा ६३ के.व्ही.चा असून त्यावर जवळपास १५० हून अधिक शेतकरी आपल्या मोटारी चालवतात . त्यामुळे जो शेतकरी वीज प्रवाह आल्यावर पहिल्यांदा विद्युत मोटार चालू करतो त्याचीच विद्युत मोटार चालते . असे पंचवीस - तीस विद्युत मोटार त्या डी.पी.वर चालतात बाकी शेतकरी विहिरीला पाणी असून देखील आपले पिकांना पाणी देऊ शकत नाहीत . कारण त्यावर लोड येत असल्याने बेंदवस्ती डी.पी.चा ट्रान्सफार्मर सतत जळतो असतो तसेच विद्युत वाहक तारा नेहमी तुटतात . कधी - कधीतर ट्रान्सफार्मर मधून ऑइल फेकले जाते अशा घटना वारंवार होतात . अशा घटनांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते . जर आपण सदर बेंद डी.पी.वरील शेतकऱ्यांचा ट्रान्सफार्मर वरील लोड कमी करून टोणपे वस्ती येथे एक नवीन १०० चा ट्रान्सफार्मर दिला तर बेंदवस्ती डी.पी.वरील लोड कमी होईल . व ती व्यवस्थित चालेल . तसेच शेतकऱ्यांची , जनावरे , माणसे यांना पिण्याच्या पाण्याची सोय होईल . तसेच शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी देता येईल व जनावरांना चारा तयार करता येईल . अगोदरच हा भाग डोंगराळ आहे व येथील जमीन हलकी असल्याने येथे पिकांना वारंवार पाणी दिल्याशिवाय पिके येत नाहीत  तरी आपणास विनंती की . राणेगाव येथील टोणपे वस्ती येथे नवीन १०० चा " ट्रान्सफार्मर मंजूर करावा . त्यासाठी लागणारा खर्च सर्व शेतकरी भरण्यास तयार आहे . असे सौ . हर्षदाताई काकडे यांनी उपकार्यकारी अभियंता अरविंद एस कुकडे यांना दिलेल्या निवेदनात म्हणाल्या आहेत.

 यावेळी नवनाथ खेडकर ,रघुनाथ गाढवे,भागवत मुलमुले,नवनाथ बिबे,महादेव खेडकर ,अदिक गाढवे,तुकाराम बिबे,नारायण गाढवे,पंडित खेडकर ,अभिषेक बिबे आधी संकेत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या