Ticker

6/Breaking/ticker-posts

होय ! पंतप्रधान मोदींच्या पुतणीचे भाजपाने कापले तिकिट ... का?

 


लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी सोनल यांना भाजपकडून गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली. उमेदवारांच्या निवडीसाठी पक्षाने तयार केलेल्या नियमांवर बोट ठेवत सोनल यांना तिकीट देण्यास भाजपाने नकार दिला आहे.

नेत्यांचे नातेवाईक, महापालिकेत तीन वेळा कार्यकाळ पूर्ण करणारे तसेच ६० पेक्षा अधिक वय असणाऱ्यांना उमेदवारी देण्यात येणार नाही, असे भाजपकडून जाहीर करण्यात आले होते. याच निकषांवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवार निवडले गेले आहेत. 'नियम सगळ्यांसाठी सारखेच राहतील' असेसांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणीलात डावलण्यात आले आहे.

सोनल यांनी भाजपकडे बोदकदेव मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपकडे तिकीटाची मागणी केली होती. सोनल या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाऊ प्रल्हाद मोदी यांची मुलगी आहे. प्रल्हाद मोदी शहरात एक रेशनिंग दुकान चालवतात. प्रल्हाद मोदी गुजरात योग्य दर दुकान संघाचे अध्यक्षही आहेत.

सोनल यांना भाजपने तिकीट नाकारल्याने त्यांचे वडील प्रल्हाद मोदी यांनी मात्र तिखट प्रतिक्रिया व्यक्त केलीय.भारत सरकारने कुटुंबाच्या व्याख्येसाठी रेशनिंग कार्ड प्रमाण मानलं आहे आणि माझ्या रेशन कार्डवर नरेंद्र भाईंचं नावही नाही, त्यांनी तर देशालाच आपलं कुटुंब मानत घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आज देशातील प्रत्येक भाऊ-बहिण त्यांच्या कुटुंबाचाच एक सदस्य आहे. आमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यानं पंतप्रधानांसोबत कधी फोटोही काढला नाही तसंच सार्वजनिक रुपात त्यांच्या नावाचा किंवा पदाचा गैरवापर केला नाही, अशी प्रतिक्रिया प्रल्हाद मोदी यांनी

गुजरातच्या राजकोट, अहमदाबाद, वडोदरा, सूरत, भावनगर आणि जामनगर सहीत सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर ८१ नगरपालिका, ३१ जिल्हा पंचायती आणि २३१ तालुका पंचायतींसाठी २८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या