Ticker

6/Breaking/ticker-posts

या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी पोलिसांच्या ताब्यात !

 या कारणामुळे झाली कारवाई


 




लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

कराड : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सत्त्वशीला चव्हाण यांना पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात ताब्यात घेतले. कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करताना पोलिसांनी कारवाई ही केली. 

साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज विविध संघटनाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्हा महिला संघटना, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडी अशा विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारच्या निषेध नोंदवला.

“शेतकऱ्यांचे कायदे करणाऱ्यांना शेती कशी करतात हे माहिती आहे का? शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत की अदानी अंबानी यांच्या फायद्याचे आहेत?” असा जळजळीत सवाल सत्वशीला पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला विचारला. दक्षिण कराड या मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाणांचे प्राबल्य राहिले आहे. सत्त्वशीला चव्हाणही कराड तालुक्यात चांगल्याच सक्रिय आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सत्त्वशीला चव्हाण मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गाजवळ कोरेगाव-सातारा मार्ग काही काळासाठी रोखून धरला होता. तर काही आंदोलकांनी या महामार्गावरच चूल मांडून भाकऱ्या थापल्या. त्यानंतर काही वेळासाठी याठिकाणी वाहतूक विस्कळित झाली. आंदोलनानंतर पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या