Ticker

6/Breaking/ticker-posts

नगर- कल्याण राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोकोमुळे तासभर चक्का जाम,


  पारनेर तालुक्यातील शेतकरी संघटनांच्या वतीने कृषी कायद्याच्या विरोधात झाला रास्ता रोको...

लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

टाकळी ढोकेश्वर:

 केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी  व दिल्ली येथे गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात  संयुक्त किसान एकता मोर्चाने पुकारलेल्या राष्ट्रव्यापी "चक्काजाम" आंदोलनाला  सक्रीय पाठिंबा देण्यासाठी पारनेर तालुक्यातील शेतकरी संघटनाच्या वतीने शनीवार दि. ६ फेब्रुवारी रोजी टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकात  नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर  सकाळी १०:३० ते ११:३० पर्यंत रस्ता रोको आंदोलन झाले.त्यानंतर 

 याप्रसंगी निवेदन भुमिपुत्र शेतकरी संघटना, राष्ट्रीय किसान मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने पारनेर चे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांना देण्यात आले.

 या निवेदनामध्ये केंद्रातील भाजपा सरकारने जगाचा पोशिंदा अन्नदाता शेतकऱ्यांच्या विरोधात आणलेले नवीन तीन काळे कायदे ताबडतोब रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या ७० दिवसांपासून संपूर्ण देशातील शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमेवर लोकशाही मार्गाने व शांततेने आंदोलन करीत आहेत. परंतु गेंड्याच्या कातडीच्या भाजपा सरकारवर अद्याप कुठलाही परिणाम झालेला दिसत नाही. उलट सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी व शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा व बळाचा गैरवापर करून शेतकऱ्यांवर दडपशाही व अत्याचार करीत आहेत. या विरोधात हा रस्ता रोको आंदोलन झाले.

 यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, बहुजन क्रांती मोर्चा जिल्हा संयोजक राजेंद्र करंदीकर,संतोष हांडे,संतोष कोरडे,अविनाश देशमुख,अरूण रोडे,तुषार ठुबे,बाळासाहेब शिरतार,संतोष गागरे,रामदास साळवे,पोपट दरेकर,संतोष वाबळे, तेजस भोर, सचिन भोर,मंजाबापू वाडेकर,संदिप जाधव,सुलाबाई आदमाने, महेश झावरे, आदी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या