Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगावचे पोलिस बाळासाहेब नागरगोजे यांचा पोलिस महानिरीक्षकांचे हस्ते सत्कार

 


लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

शेवगाव : शेवगाव पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांचा जीवन रक्षा पदक जाहीर झाल्याबद्दल नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांनी त्यांचा सत्कार करुन त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.  

 
नागरगोजे यांनी नेवासा पोलिस स्टेशनला असताना १२ डिसेंबर २०१८ रोजी अनिता धनसिंग परमेश्वर वय ३५ हिस प्रवरा नदीत बुडत असताणा वाचवले होते. त्यांनी हि शौर्यपुर्ण कामगिरी दाखवल्या बद्दल नागरगोजे यांना जीवन रक्षक पदक जाहीर करण्यात आल्याने त्यांचा महानिरीक्षक दिघावकर यांनी सन्मान केला .

 यावेळी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक दीपाली काळे, उप विभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, प्रांताधिकारी देवदत्त केकाण शेवगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या