Ticker

6/Breaking/ticker-posts

स्वस्तात टायरचे अमिश दाखवुन फसवणूक करणारा १ तोतया विक्रेता जेरबंद..!

 




लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

  कर्जत:- टायर कंपनीचा अधिकृत विक्रेता नसताना अधिकृत विक्रेता असल्यासाचे सांगुन. स्वस्तात टायर देतो म्हणून  राज्यात अनेकांची फसवणूक करणारा तोतया विक्रेता कर्जत पोलिसांनी गाजाआड केला. एकजन मात्र फ रार आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जत येथील टायरचे व्यापारी धनंजय दळवी व त्यांचे सहकारी यांची पुणे येथील गणेश पिंगळकर या इसमाने अधिकृत टायरचा विक्रेता आहे असे सांगून सुरुवातीस विश्वास संपादन करून 6 लाखाचे टायर विकत दिले. मागून सुद्धा GST बिल दिले नाही. दुसऱ्या वेळेस  पैसे दिले असता टायर दिले नाही आणि पैसेही माघारी दिले नाही. व ते देन्यास टाळा टाळ करीत होता. 

धनंजय दळवी यांचेकडन एकूण बारा लाख 83 हजार रुपये घेऊन त्यांना फक्त सहा लाख 83 हजार रुपये किमतीचे टायर दिले. यामुळे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. टायर कंपनीचा अधिकृत विक्रेता नसताना अधिकृत विक्रेता असल्यासाचे सांगत होता. दुसऱ्याच एका डीलर कडून टायर घेऊन इतर व्यापारी 10 टक्के डिस्काउंट देतात तर हे 15 टक्के डिस्काउंट देत होते.

 दळवी यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याचे तपासामध्ये  कर्जत पोलिसांनी पुणे येथे जाऊन गोपनीय व इतर माहितीच्या आधारे तपास करून दाखल गुन्ह्यात सहभागी असलेला गणेश पिंगळकर याचा मित्र  सुभाष जाधव (राहणार कोथरूड) येथून कोथरूड पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यास अटक केली आहे. कर्जत पोलिस आल्याचा सुगावा गणेश पिंगळकर याला लागताच त्याने पुणे सोडून मुंबईकडे पलायन केले आहे. कर्जत पोलिस पिंगळकर याचा शोध घेत आहेत.

 गणेश पिंगळकर याने कर्जत तालुक्यात बऱ्याच व्यापाऱ्यांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. दाखल गुन्ह्यातील अटक आरोपी अमित सुभाष जाधव यास माननीय न्यायालयाने  तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. फरार आरोपी गणेश कांतराव पिंगुळकर यांचे विरुद्ध अगोदर कोल्हापूर ,जळगाव,केज येथे  फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे. ही कारवाई  पोलीस अधीक्षक अहमदनगर  मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल उपविभागीय पोलिस अधिकारी  अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक  चंद्रशेखर यादव,यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने पोलिस जवान सुनील खैरे, श्याम जाधव, प्रशांत राठोड यांनी केली आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश माने हे करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या