Ticker

6/Breaking/ticker-posts

मानलेल्या लेकीच शिक्षक दाम्पत्याकडून कन्यादान..!

 


लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

पाथर्डी :-सामाजिक भावना जपत पाथर्डी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवर शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या दाम्पत्याने मानलेल्या लेकीचे कन्यादान करून आजाराने त्रस्त झालेल्या  जन्मदात्या वडिलांच्या डोक्यावरचे ओझे कमी करण्याचं काम केले आहे. जमिनीचा तुकडा तर नाही एवढंच  काय रहायला घर नाही. आणि गेले सहा वर्षापासून घराचा पोशिंदा दुर्धर असाध्य आजाराने पिडीत,त्यात लग्नाला आलेली लेक अशी परिस्थितीत पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील भीमराव चन्नेकर कुटुंबाची अवस्थेत आहे.

 

हि व्यथा समजल्यावर सौ.अनुराधा व पोपटराव फुंदे या शिक्षक दाम्पत्याने या कुटुंबीयांची भेट घेवून आजारपणासाठी काही मदत करुन गीताला आपली लेक मानत तिच्या विवाहाची जबाबदारी स्विकारली होती.  चन्नेकर कुटुंबातील लेक गीता हिचा विवाह औरंगाबाद येथील सोनवणे कुटुंबाशी जमला अन दिल्या शब्दाला जागत आपल्या मानलेल्या लेकीच मोठ्या आनंदात फुंदे दाम्पत्याने कन्यादान करुन दिलं.मानलेल्या लेकीचे कन्यादान आपल्या स्वतःच्या पोटाच्या लेकीसारखे करून उपस्थित सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते. 

 

भविष्यात अशा अनेक गरजू निराधार कुटुंबातील मुलींचे विवाह करण्याचा मानस आहे.निर्धार कुटुंबाचा आधार बन्याचे काम करून शक्य आहे त्या शक्तीने त्यांना मदत करणे आणि त्यांच्या उमेदीला ,जगण्याला अधिक कसे बळ देता येईल असाच प्रयत्न आमचा असणार आहे.यातून आत्मिक समाधान लाभून जीवन जगण्याचा आनंद मिळतो.असे यावेळी बोलतांना गुरुकुल महिला आघाडी तथा सेवाश्रय फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनुराधा फुंदे म्हणाल्या.आपल्या घासातला घास वंचितांना देणार्‍या फुंदे शिक्षक दाम्पत्यानी गरजू पिडीत कुटुंबातील मुलीच केलेल कन्यादान याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या