Ticker

6/Breaking/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले- दिपक खेडकर

 लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर - छत्रपती शिवाजी महाराजांनी खर्‍या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण केले होते. त्यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वामुळे आज जगभरात त्यांच्या कार्याची किर्ती पोहचली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य समाजासमोर आणले. त्यांनी शिवजयंती सार्वजनिक स्वरुपात साजरी करण्यास सुरुवात करुन जनमानसातील त्यांची प्रतिमा उंचवली. या राष्ट्र पुरुषांनी समाजा उन्नत्तीचे काम केले आहे, हेच कार्य आपण पुढे सुरु ठेवले पाहिजे. समाजातील दुर्लक्षित दुर्बल घटकांसाठी कार्य करावे. फुले बिग्रेडच्या माध्यमातून राष्ट्र पुरुषांच्या कार्याचा जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम केले जात आहे, असे प्रतिपादन फुले ब्रिगेडचे अध्यक्ष दिपक खेडकर यांनी केले.

     क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती सार्वजनिक उत्सवाची सुरुवात केली. शिवजयंतीनिमित्त फुले ब्रिगेडच्यावतीने माळीवाडा येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ शिवसन्मान सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष दिपक खेडकर, डॉ.सुदर्शन गोरे, जालिंदर बोरुडे, बजरंग भुतारे, विष्णूपंत म्हस्के, किरण जावळे, नितीन डागवाले, महेश सुडके, मोहित सत्रे, विक्रम बोरुडे, गणेश शेलार, प्रसाद बनकर, गणेश जाधव, विकास खेडकर, प्रविण वारे, विश्‍वास शिंदे, श्रीकांत आंबेकर, आशिष भगत आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी डॉ.सुदर्शन गोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले आयुष्य रयतेच्या कल्याणासाठी वेचले. तर तर महात्मा फुले हे अद्यसमाजसुधारक होते. त्यांनी समाजातील अनाष्ठरुढी परंपरांवर आघात करुन समाजोन्नत्तीचे काम केले. या राष्ट्र पुरुषांचे कार्य आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे सांगितले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या