Ticker

6/Breaking/ticker-posts

नगर जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती ..

 जिल्ह्यातील ग्राम पंचायतींना स्व. आर.आर (आबा) पाटील सुंदर ग्राम पुरस्कार प्रदान

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर : -. अतिशय कष्टातून  स्वताचे नेतृत्व तयार करणार्‍या आबांनी पारदर्शकपणे कारभार केला. गावविकासा साठी असणार्‍या त्यांच्या तळमळीने विविध योजना आकाराला आल्या आणि त्यातून हजारो गावांचा कायापालट झाला.  पुरस्कार त्यांच्या नावाने आणि त्यांच्या स्मृतिदिनी घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी स्व. आर. आर. आबांच्या आठवणींना उजाळा दिला .पालकमंत्री श्री. मुश्रीफ आणि मान्यवरांच्या हस्ते  

 २०१८-१९ मध्ये जिल्हास्तरावर प्रथम - 

ग्रामपंचायत खडांबे खुर्द (ता. राहुरी ) 

आणि वाळवणे (ता. पारनेर) यांना विभागून. 

सन २०१९-२० मध्ये जिल्हास्तरावर प्रथम -

 ग्रा.पं. गणोरे (ता. अकोले) आणि 

आव्हाणे बु. (ता. शेवगाव) यांना विभागून. 

सन२०२०-२१ मध्ये जिल्हस्तरावर प्रथम - 

ग्रा. पं. निमगाव बु. (ता. संगमनेर) आणि खडकेवाके 

'(ता. राहाता) यांना विभागून. 

 सन २०२०-२१ मध्ये तालुकास्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे आहेत. 

डोंगरगाव (ता. अकोले), निमगाव बु.(ता. संगमनेर), 

करंजी (ता. कोपरगाव), श्रीरामपूर- जाफराबाद 

आणि मुठे वडगाव यांना विभागून. 

खडकेवाके (राहाता), सडे (राहुरी), वडाळा बहिरोबा (नेवासा), राक्षी (शेवगाव), चिचोंडी (पाथर्डी), खर्डा (जामखेड), कानगुडवाडी आणि कोपर्डी विभागून

 (कर्जत), मढेवडगाव (श्रीगोंदा), जामगाव (पारनेर) आणि टाकळी खातगाव (नगर)  या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 


जिल्हास्तरावरील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना ४० लाख तर तालुका स्तरावर पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना १० लाख रुपयांचे पारितोषिक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 


यावेळी जिल्हा स्तरावरील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीनी केलेल्या विकासकामांची यशोगाथा लघुपटाद्वारे दाखवण्यात आली.


 यावेळी ग्रामसेवकांच्या वतीने ग्रामविकास अधिकारी व संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे (गणोरे),  सरपंचांच्या वतीने आव्हाने बु. च्या सरपंच संगीता कोळगे यांनी मनोगत व्यक्त केले. 


या पुरस्कार वितरण कार्यक्रमास जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे सदस्य, पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, अधिकारी-कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या