( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्यात
कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर अनेक शाळा आणि महाविद्यालये बंद होती. परंतु हळूहळू कोरोनावर
नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला यश येत आहे. 10 वी आणि 12
वीच्या परीक्षांसंदर्भात शालेय शिक्षण मंत्रालयानं मोठी घोषणा
केलीय. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल
करण्यात आलाय.
आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या प्रचलित कालावधीमध्ये परीक्षा आयोजित न करता शासन मान्यतेने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांच्या वेळापत्रक बदलण्यात आलंय. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी परीक्षा आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र 10 वी परीक्षा एप्रिल-मे 2021 मध्ये अनुक्रमे 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 आणि 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 मध्ये आयोजित करण्यात येणार आहेत.
10 वी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र 10 वीची परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार आहे, तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वीची परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 या कालावधीत होणार आहे. तसेच महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही 16 फेब्रुवारी 2021 पासून वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे, यासाठी एप्रिल-मे 2021 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रकाही जाहीर करण्यात आले.
कोविड 19 च्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन तसेच आरोग्य
विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन
करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची
माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय. राज्यात इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वीच्या शाळांमध्ये दिवसेंदिवस
विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असून, 18 जानेवारी 2021
रोजी 21 लाख 66 हजार 56
विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत आणि 21 हजार 287
शाळा सुरू आहेत. यात एका दिवशी केवळ पन्नास टक्के उपस्थिती ठेवून
शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सुमारे 76.8% विद्यार्थी
शाळांमध्ये येत आहेत, अशी माहिती प्रा. गायकवाड यांनी यावेळी
दिली होती.
0 टिप्पण्या