Ticker

6/Breaking/ticker-posts

स्वत:ला काय जमतं ते ओळखता आलं पाहिजे-प्रविण राजगुरु

 ढाकणवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच व सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 खरवंडी कासार :- हाती घेतलेले कुठल्याही प्रकारचे कार्य उत्तमरीतीने करणे हीच खरी देशभक्ती असते कम्रे इशू भजावाही संत ज्ञानेश्वर व तुकोबांनी आपल्याला शिकवले आहे.  सर्व मिळून देशभक्त झालोतरच आपण छत्रपती शिवाजीमहाराजांचे खरे अनुयायी ठरू. प्रत्येकाकडे बुद्धि असतेच त्याचा कसा वापर करावा हे समजले पाहिजे, स्वत:ला काय जमतं ते ओळखता आलं पाहिजे, असे मत नगरसेवक प्रविण राजगुरू यांनी केले.

 ढाकणवाडी येथील नवनिर्वाचित सरपंच सौ. सुरेखा ढाकणे व सदस्य यांचा सत्कार शिवजयंतीच्या निमित्ताने नगरसेवक प्रविण राजगुरू मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आला. त्या वेळी नगरसेवक अनिल बोरुडे, शिक्षकनेते गंगाधर सुपेकर,उद्योजक प्रविण फुंदे, ढाकणवाडी ग्रामपंचायतीचे जेष्ठ सदस्य बाबुराव ढाकणे, राजेंद्र ढाकणे,सोमनाथ वारे आनिल खेडकर ,अभिमान बडे,बाळू घुले वासुदेव बटुले व  नवनिर्वाचित सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  पुढे बोलतांना राजगुरू म्हणाले की एखाद्या नेत्यासोबत गुंड असतील तर तो गुंडच आहे असे समजा. एखाद्या नेत्या सोबत दलाल असतील तर तो दलाल आहे असे समजा. एखाद्या नेत्यासोबत उद्योगपती असेल तर तो उद्योजक आहे असे समजा. एखाद्याने त्यासोबत विद्वान असतील तर तो विद्वान आहे असेच समजा आणि एखाद्या नेत्यासोबत हे सगळे दिसत असतील तर तो अष्टपैलू यशस्वी नेता आहे. असेच समजा असे त्यावेळी त्यांनी सर्वाना कानत्र दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक नेते गंगाधर सुपेकर यांनी केले तर आभार प्रविण फुंदे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या