Ticker

6/Breaking/ticker-posts

नगर सीए शाखेला उत्कृष्ट शाखेचा पुरस्कार

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अ. नगर :- नगर सीए शाखेला इन्स्टीट्युट ऑफ चार्टर्ड  अकौंटंटस  ऑफ इंडियाच्या पच्शिम विभागातुन (WIRC) लघु शाखा गटात उत्कृष्ट शाखेचा प्रथम पुरस्कार व विद्यार्थी शाखेस द्वितीय पुरस्कार जाहीर झाला आहे अशी माहिती शाखेचे अध्यक्ष सीए किरण भंडारी व विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष सीए संदीप देसरडा यानी दिली.

 सन २०२०-२१ ह्या वर्षासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. इन्स्टीट्युट ऑफ चार्टर्ड  अकौंटंटस  ऑफ इंडियाच्या पच्शिम विभागात महाराष्ट्रगुजराथ व गोवा ह्या तीन राज्यांचा समावेश होतो. सदर पुरस्काराची घोषणा पच्शिम विभागाचे मावळते अध्यक्ष सीए ललित बजाज ह्यांनी नुकतीच केली. नगर सीए शाखेने सन २०२०-२१ ह्या वर्षात सीए सभासदांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी कोरोंना सारख्या महारमारीच्या संकटावर मात करत ऑनलाइन विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम हाती घेतले. ह्या सर्व उपक्रमांच्या निकषांवर सदर पुरस्कार जाहिर झाला आहे.

 

यावेळी बोलताना शाखेचे अध्यक्ष सीए किरण भंडारी म्हणाले की नगर सीए शाखेची सन २०२०-२१ साठीची व्यवस्थापकीय समिती पदाधिकारी सीए संदीप देसरडा  (उपाध्यक्षसचिव व खजिनदार ), (डॉ) परेश बोरा (माजी अध्यक्ष) सीए ज्ञानेश्वर काळे व सीए पवनकुमार दरक (समिति सदस्य) तसेच माजी अध्यक्ष सीए सुशिल जैनसीए प्रसाद भंडारीसीए ज्ञानेश कुलकर्णी  ह्यांची भक्कम साथ व सहकार्य लाभले ह्याचबरोबर माजी अध्यक्ष सर्वश्री सीए मोहन बरमेचासीए विजय मर्दासीए संजय देशमुखसीए अजय मुथासीए मिलिंद जांगडा ह्या सर्वांचे बहुमोल मार्गदर्शन व प्रोत्साहन ह्याचा ह्या यशात मोठा वाट आहे.

 

नगर सीए शाखेला ओळीने दरवर्षी पुरस्कार मिळण्याची परंपरा असुन ती याही वर्षी कायम राहिली आहे. ह्या यशाबद्दल नगर शाखेचे सर्व सीए सभासद तसेच विभागीय व केंद्रीय परिषदेच्या पदाधिकाऱ्याकडून अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या