Ticker

6/Breaking/ticker-posts

कोणालाही सामाजिक न्यायापासून वंचित ठेवता येणार नाही- न्या.जाधव

 

नेवासा न्यायालयात साजरा केलेल्या जागतिक सामाजिक न्याय दिन साजरा






लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 नेवासा :-कोणत्याही भारतीय नागरिकाला त्याची जात,धर्म, पंथ, भाषा किंवा प्रदेश वा इतर कारणाने सामाजिक न्यायापासून वंचित ठेवता येणार नाही असे राज्यघटनेत नमूद असल्याचे प्रतिपादन नेवासे येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.बी.जाधव यांनी केले.

    नेवासा न्यायालयात साजरा केलेल्या जागतिक सामाजिक न्याय दिन कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर न्या.बी.यु.चौधरी, न्या.श्रीमती एस.डी.सोनी, न्या.जे.आर.मुलाणी, न्या.श्रीमती पी.व्ही.राऊत, न्या.श्रीमती ए.बी.निवारे, अँड.के.एच.वाखुरे उपस्थित होते.

     स्वागत व प्रास्ताविक अँड.के.एच.वाखुरे यांनी केले.न्या.जाधव पुढे बोलताना म्हणाले की,मे.सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणात तृतीय पंथी व्यक्तीला निवडणूक लढवण्याचा अधिकार प्राप्त करून दिला हे खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाचे उदाहरण म्हणता येईल.जागतिक सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यासाठी जगातील अनेक देश संयुक्त राष्ट्र संघटनेसोबत काम करत आहेत.त्या अंतर्गत गरिबी,बेरोजगारी,जात,लिंग,धर्म या सर्वांच्या आधारावर विभागल्या गेलेल्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो असेही न्या.जाधव म्हणाले.

न्या.श्रीमती पी.व्ही.राऊत यावेळी बोलताना म्हणाल्या की,माणुसकी दाखवणे म्हणजेच सामाजिक न्याय आहे.नैतीकतेचे पालन दाखवत अनेक सामाजिक कामे न्यायसंस्था करीत आलेली आहे.महिला आता प्रत्येक क्षेत्रात येत आहे,हे सामाजिक न्यायाचे मोठे उदाहरण असल्याचे त्या म्हणाल्या.राज्य घटनेने प्रत्येकाचा विकास व्हावा म्हणून आरक्षण देऊन सामाजिक न्याय केलेला आहे. कार्यक्रमास अधीक्षक एस.जे.लांबदाडे, आर.व्ही.वाव्हळ,श्रीमती एस.एस.उलाने,अँड.किशोर चामुटे,लीगल अॅडचे शेंडगे आदी करोना नियमांचे पालन करत हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या