Ticker

6/Breaking/ticker-posts

सर्व नेत्यांनी जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करावी : वसंत लोढा

 

लोकनेता न्यूज

 ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले असतांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी केवळ दोन दिवसाचा अवधी राहिलेला असतांना विभागीय पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन  वसंत लोढा यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे नेतृत्व करणाऱ्या सर्व पक्षांच्या नेतेमंडळींना व प्रमुख उमेदवारांना जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत वसंत लोढा यांनी जाहीर पत्रक काढून करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नेत्यांनी संवेदनशीलता दाखवत जिल्हा बँक निवडणुकीसाठी एकत्र येत सामोपचाराने ही निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन केले आहे. केलेल्या आवाहनाच्या प्रती वसंत लोढा यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांना पाठवल्या आहेत.

          वसंत लोढा यांनी काढलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, सध्या आपल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीमुळे सगळीकडे वातावरण तापले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मी देखील एक उमेदवार आहे परंतु सर्वांगी आणि खोलवर विचार केला असता मी असे एक आवाहन करू इच्छितो कीज्यायोगे सर्व देशासाठी आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे ते आदर्श उदाहरण ठरावेअसा त्यामागील शुद्ध हेतूने मी आवाहन करत आहे.

आपली अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतकरी आणि कामगार वर्गाची कामधेनू आहे. बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचवण्याचेच काम झाले आहे. विशेष म्हणजे फक्त महाराष्ट्रातच किंवा भारतातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडामध्ये आजही ही बँक नंबर 1 ची बँक म्हणून ओळखली जाते.

सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील जवळजवळ 75% बँका अडचणीत असताना केवळ नगरची ही बँक आजही आत्मविश्वासाने सुस्थितीत उभी आहेही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. या बँकेच्या उभारणीमध्ये स्व.मोतीभाऊ फिरोदियाभाऊसाहेब थोरातपद्मश्री विट्ठलराव विखे पाटीलआ. शंकरराव काळे, आ.शंकरराव कोल्हे, बाबूराव तनपुरे, मारुतराव घुले, यशवंतराव गडाख अशा अनेक मान्यवरांचा फार मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत या बँकेमध्ये कधीही पक्षीय राजकारणाचा वारसा चालवला गेला नाही. उलटपक्षी सर्वपक्षीय समविचारी लोकांनी एकत्र येऊन या बँकेची प्रतिष्ठा आजही टिकवून ठेवलेली आहे.

मागील एक वर्षापासून संपूर्ण देशच नव्हे तर संपूर्ण जग करोनाच्या विळख्यामध्ये पिळून निघाले असल्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये न भूतो न भविष्यती अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हे आपण सर्वजण जाणतोच आहोत. आपण जर खरे तळमळीचे समाजाभिमुख काम करणारे लोकप्रतिनिधी असू तर या परीस्थितीची जाण ठेवणे आपल्याला आवश्यक आहे. त्यातल्या त्यात सध्याचे वातावरण पाहता शेतकरीवर्ग, कामगारवर्ग त्यांच्यासाठी झटणाऱ्या विविध पतसंस्थासहकारी सोसायट्या या देखील प्रचंड बाधित झालेल्या आहेत. अशा वातावरणामध्ये जर आपल्या नेहमीच्या पारंपारिक व ऐतिहासिक राजकीय स्टाईलने ही निवडणुका होत असतील तर ती निश्चितच एक असंवेदनशील आणि दुर्दैवी गोष्ट असेल. कारण नाही म्हटले तरी काही सन्माननीय अपवाद वगळता बँकेच्या निवडणुकीमध्ये तेच राजकारणफोडाफोडीचे कपट कारस्थाने आणि ते करताना प्रचंड पैशाचा अपव्यय हे ओघानेच येतेच. या निवडणुकीमध्ये जे जे मान्यवर माझ्यासह उमेदवार म्हणून रिंगणांमध्ये आहेत ते सर्वच समाजाप्रती झटणारे संवेदनशील लोकप्रतिनिधी असावेत ही माफक अपेक्षा आहे. आणि मग अशा लोकप्रतिनिधींनी सगळीकडे चालू असलेला हा बाका प्रसंग पाहताजर एक मताने एकत्र येऊन गट-तटराजकारण सर्व बाजूला ठेवूनखऱ्या अर्थाने या बँकेची प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी आणि निवडणुकीचा लाखो रुपयांचा खर्चचा अपव्यव टाळण्यासाठी, आपली शक्ती वाया घालवण्यापेक्षा ही निवडणूक बिनविरोध करून आपण सर्वांनी एक वेगळाच नवा आदर्श निर्माण करून दाखवू. अशी एक प्रामाणिक इच्छा माझी आहे. आपण वैचारिक दृष्ट्या निश्चित प्रगल्भ आहोत हे दाखवण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

यासाठी या निवडणुकीत उतरलेल्या सुकाणू सांभाळणाऱ्या सर्व प्रमुख नेत्यांना माझी अशी कळकळीची विनंती आहेकी प्रत्येक ठिकाणी आपली प्रतिष्ठा किंवा राजकीय वर्चस्व याचे निकष न लावता आणि या करोना च्या पार्श्वभूमीवर सगळीकडची दुरावस्था पाहता अशी असंवेदनशील निवडणूक होता कामा नये. निवडणूक जर खेळीमेळीच्या सामोपचाराने बिनविरोध झाली तर त्यासारखा सुवर्ण दिवस या बँकेच्या इतिहासात नसेलहे आवाहन करताना मी स्वतः उमेदवार म्हणून माझे पहिले पाऊल पुढे टाकत सर्वप्रथम माघार मी घेईन.या आवाहनाचा सकारात्मक, निष्पक्ष आणि मोठ्या मनाने विचार करून सर्व मंडळींनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जर प्रयत्न केले तर अशक्य असे काहीही नाहीअसे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

या अहवानाच्या प्रती मंत्री बाळासाहेब थोरात, यशवंतराव गडाख, आ. राधाकृष्ण विखे, ना. शंकररव गडाख, प्रसाद तनपुरे, ना. प्राजक्त तनपुरेखा. सदाशिव लोखंडे, खा. सुजय विखे, आ. बबनराव पाचपुते, आ. मोनिका राजळे, शिवाजीराव कर्डीले, आ.अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, सीताराम गायकर, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. आशुतोष काळे, बिपिनराव कोल्हेउदय शेळकेकाकासाहेब कोयटे आदींना पाठवण्यात आल्या आहेत. अशी माहिती वसंत लोढा यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या