Ticker

6/Breaking/ticker-posts

ढोरजळगांवनेच्या सरपंचपदी सौ गौरी ऊर्किडे तर उपसरपंचपदी प्रतिभा कराड बिनविरोध ..!

 

 

लोकनेता न्यूज

 ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) ढोरजळगांव :-राजकीय दृष्या महत्वपुर्ण मानल्या जाणा-या ढोरजळगांने ग्रामपंचायत निवडणुकीत जगदंबा ग्रामविकास मंडळाने ९ जागांवर दणदणीत विजय मिळविला होता जंगदबा ग्रामविकास मंडळाचे नेतृत्व माजी सरपंच गणेश कराड व आनंता ऊर्किडे यांनी केले नुकतीच सरपंच उपसरपंच निवडणुक प्रक्रिया पार पडली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ढोरजळगांनेचे माजी सरपंच आनंता ऊर्किडे यांच्या सौभाग्यवती सौ गौरी आनंता ऊर्किडे  यांची तर उपसरपंचपदी प्रतिभा ज्ञानेश्वर कराड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

          सरपंच व उपसरपंच पदासाठी एकच अर्ज आल्याने  गौरी ऊर्किडे व प्रतिभा कराड यांच्या बिनविरोध निवडीची प्रक्रिया पार पडली  सरपंचपद हे ओबीसी पुरूष प्रवर्गातील उमेदवारासाठी जाहीर झाले आहे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन संजय जगताप यांनी काम पाहीले तर त्यांना ग्रामविकास आधिकारी प्रतिभा पिसोटे यांनी साथ दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्त्र किशोर कराड, मंगल गणेश कराड, आश्विनी अभय कराड, लिलाबाई भिमराज ऊर्किडे, मंगल आशोक माळी, शिला शांतवन साके, राजश्री रघुनाथ माळी उपस्थित होते.

        यावेळी सरपंच सौ गौरी ऊर्किडे बोलताना म्हणाल्या की मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता गावातील विकासभिमुख कामे करण्यावर भर दिला जाईल महिलासांठी ग्रामपंचायतीच्या विविध योजना राबविण्यावर भर देऊन आमदार मोनिकाताई राजळे यांच्या  मार्गदर्शनाखाली महिला सक्षमिकरणावर भर देऊन विविध कल्याणकारी योजना राबवुन विकासांचे काम करण्यावर भर देणार आसल्याचे ऊर्किडे यांनी बोलताना सांगितले.

     निवडणुक प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी  बुवासाहेब केकाण, सुखदेव कराड, लक्ष्मण डोळस, एकनाथ कराड, मोहनराव ऊर्किडे ,बाबासाहेब खाडे,बाळासाहेब कराड, आदिनाथ कराड, अँड भागचंद ऊर्किडे, सुखदेव ऊर्किडे, बाळासाहेब कराड, नितीन कराड, मधुकर कराड, रामकिसन फुंदे,बाजीराव कराड,सुरेश डाके, आशोक माळी, शांतवन साके, वसंत कराड, भुजंग ऊर्किडे, रमेश कराड, रामेश्वर ऊर्किडे, भाऊसाहेब रामनाथ कराड,विष्णु नवले, भगवान पाटेकर, पालवे मामा ,चंद्रकांत कराड, ज्ञानेश्वर ऊर्किडे, आदीनी परीश्रम घेतले.

       नवनिर्वाचित सरपंच गौरी ऊर्किडे व उपसरपंच प्रतिभा कराड यांच्या निवडीचे आमदार मोनिका राजळे जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे, तालुकाध्यक्ष ताराचंद लोंढे, बापुसाहेब पाटेकर, उमेश भालसिंग, कचरू चोथे आदीच्यावतीने अभिंनदन होत आहे.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या