लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
चिंचपुरपांगुळ ग्रामपंचायतीत सदस्य संख्या नऊ
आहे.
सरपंच पदासाठी सौ बडे यांचा एकमेव अर्ज आल्याने सर्वानुमते सौ.
प्रगती धनंजय बडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली,
यानंतर निवड समितीकडून
सौ.प्रगती धनंजय बडे यांना विजयी घोषित करण्यात आले.चिंचपुर पांगुळ ग्रामपंचायतीत
सत्ता गोपीनाथ मुंडे ग्रामविकास पॅनलच्या हाती आल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा. यावेळी पॅनल प्रमुख श्री धनंजय बडे,
श्री शामराव बडे पाटील, वडगावचे
माजी सरपंच आदिनाथ बडे यांचे मार्गदर्शन लाभले. सरपंच पदासाठी निवड प्रसंगी
निवडणूक अधिकारी म्हणून श्री कराळे , तलाठी मनोज खेडकर,
ग्रामविकास अधिकारी श्री रोढे आदींनी निवड प्रक्रिया पार पाडली ,
यावेळी बंडू बडे , रावसाहेब
बडे,नवनाथ बडे, सोमराज बडे तसेच सर्व
ग्रा. पं. सदस्य गावातील जेष्ठ नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या