Ticker

6/Breaking/ticker-posts

राळेगणसिद्धी ते पारनेर ट्रॅक्टर रॅली !

 


 : अण्णा हजारे यांनी केले नेतृत्व

पारनेर : - दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी प्रजासत्ताक दिनी पारनेरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. हजारे यांच्या नेतृत्वाखालील राळेगणसिद्धी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी राळेगणसिद्धी ते पारनेर अशी ट्रॅक्टर रॅली काढली. पारनेर शहरातून ही रॅली तहसिल कार्यालयावर गेल्यानंतर तहसिलदार ज्योती देवरे यांना निवेदन सादर करण्यात आले.

  सकाळी साडेदहा वाजता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीत हिरवा झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ झाला. रॅलीत ४० ट्रॅक्टर सहभागी झाले होते. प्रत्येक ट्रॅक्टरला तिरंजा ध्वज लावण्यात येऊन ट्रॅक्टरचालकांनी पारंपारीक फेटे परिधान केलेले होते. भारत माता की जय, शेतकरी एकजुटीचा विजय असो, अण्णा तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी राळेगणसिद्धी व पारनेर दुमदुमले होते.

  केंद्र सरकारने कोणत्याही चर्चेविना पारित केलेले तिन कृषी कायदे रद्द करावेत, शेतमालास हमीभाव देण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. त्यासाठी हमीभाव सुरक्षा कायदा लागू करावा, केंद्रीय कृषीमुल्य आयोगास निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायतत्ता देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन यावेळी तहसिलदारांना देण्यात आले. याच मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे येत्या ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीत उपोषण सुरू करणार आहेत.

   राळेगणसिद्धीचे माजी सरपंच जयसिंग मापारी, माजी उपसरपंच लाभेश औटी, उदयोजक सुरेश पठारे, पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, भाकपचे तालुका सचिव संतोष खोडदे, अंकुश गायकवाड, शंकर नगरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, दादा पठारे, दत्ता आवारी, शाम पठाडे, किसन मापारी, सुभाष पठारे, नानाभाऊ मापारी, रमेश औटी, संदीप पठारे, रोहिदास पठारे, सदाशिव पठारे, गणेश भापकर, सुभाष गाजरे यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या