Ticker

6/Breaking/ticker-posts

‘हे ..तालुक्याचं दुर्दैव ‘; काय म्हणाले विजय औटी

 

पारनेर :-पंधरा वर्षे तालुक्यातील जनतेने सेवा करण्यची संधी दिली. सत्ता होती तेव्हा सत्तेचा गैरवापर कधीही केला नाही . परंतू सध्या दडपशाहीच्या जोरावर तालुक्यात होणारे अनुचीत प्रकार पाहता जनतेचा प्रतिनीधी हा जनतेचा सेवक असला पाहिजे या लोकशाहीच्या ब्रीदाची विसर पडलेली माणसे लोकप्रतिनिधी होतात, हे तालुक्याचं दुर्दैव असल्याची टिका विधानसभेचे माजी उपसभापती विजय औटी यांनी नाव न घेता केली. .
             अळकुटी ( ता. पारनेर ) येथे अळकुटी पंचायत समिती गणातील शिवसेनेच्या नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता . यावेळी औटी बोलत होते , या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानि  शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले होते . मान्यवरांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनाप्रमूख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले . याप्रसंगी जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते सर, अळकुटी गट प्रमुख सखाराम उजघरे, संजय मते , संजय दादा ठुबे, गणेश मापारी, संतोष येवले , भर्तरी काने, संपत जाधव, विकास भंडारी ,अन्वर शेख, आनंद शिरोळे , ज्ञानेश्वर शिरोळे आदि मान्यवर उपस्थित होते .

               औटी म्हणाले की, सत्तेत असताना पक्षीय मतभेद बाजुला ठेवून सामान्य जनतेची कामे केली. या समाजात नितीमत्तेनं वागणाऱ्यांनाच किंमत असून नितिमत्ता नसणाऱ्या माणसांना विधानसभेत यश आलं हे तालुक्याचं दुर्देव असल्याचं ते म्हणाले . तालुक्यात सभ्यता आणि गुंडगिरी यामधील निवड करण्याची वेळ आली असून आगामी काळात गुलामगिरी संपवायची असेल तर सर्वांनी एकजूट होऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती व कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा शिवसेनेची सत्ता खेचून आणण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. लोकप्रतिनींधींचा बिनविरोधचा प्रयत्न म्हणजे हुकुमशाहीच होती . या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ज्या मतदारांनी निवडून दिले त्यांची किंमत ठेवा व एकत्र रहा . असा सल्ला त्यांनी नुतन ग्रामपंचायत सदस्यांना दिला .
             याप्रसंगी नवनिर्वाचीत ग्रा. प. सदस्य सारिका  शिरोळे , किरण शिंदे ,अरिफ पटेल , बाळासाहेब  धोत्रे , कोमल भंडारी , लता घोलप, धनंजय घोलप , मिराबाई शिरोळे यांचा औटी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी नवनिर्वाचीत सदस्य धनंजय घोलप यांचा वाढदिवस औटी  व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भगवान शिंदे यांनी केले . सखाराम उजघरे यांनी उपस्थितांचे आभार मानले .

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या