Ticker

6/Breaking/ticker-posts

शरद पवार यांच्या ‘त्या‘ विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा

 


मुंबई : धनंजय मुंडे यांनी  काल  माझी भेट घेऊन त्यांची बाजू सविस्तर मांडली आहे.मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. याबाबत पक्षातील सह कार्‍यांशी  संवाद साधू , पक्षातील वरिष्ठ सहकार्‍यांशी बोलून निर्णय घेऊ अशी भूमिका पक्षाध्यक्ष शरद यांनी मांडली.   

          मुंडे यांचा काही व्यक्तीशी घनिष्ट  संबंध आला, त्याबदधलची चौकशी चालू आहे. या प्रकरणावरून व्यासतिगत हल्ले होणार याची बहुदा त्यांना पूर्वकल्पना असावी. त्यामुळे ते आधीच कोर्टात गेले. त्यामुळे कोर्टाच्या  विषयावर मी बोलनार नाही. असही  पवार यांनी सांगितले.

   भाजपने मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला आहे. यानंतर स्वतः धनंजय मुंडे यांनी बुधवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन या प्रकरणाबाबतची वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घातली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत धनंजय मुंडे यांची पाठराखण केली असली तरी मुंडे यांच्या भवितव्याचा अंतिम निर्णय शरद पवार घेतील, असे संकेत राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्याने आज दिले आहेत. यावेळी पवार यांनी आपले मत व्यक्त करताना मुंडेवरील आरोप गंभीर असल्याचे म्हटल्याने या विधांनाची चर्चा रंगली आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या