Ticker

6/Breaking/ticker-posts

उई काप्या .. कटी पतंग.. डीजेच्या तालावर थिरकत बाल गोपाळांसह तरुणाईचा एकच जल्लोष..!




अहमदनगर :- वर्षातून एकदा  येणारा मकर संक्रातिचा सण, सुवासिनी, बच्चे कंपनी आणी  युकांसाठी मोठी पर्वणी असतो . त्यासाठी इंग्रजी नवीन वर्षातील १४  जानेवारीची  सर्वजण अतुरतेने वाट पाहत असतात. त्यासाठी आठवडाभरापासून जय्यत तयारी चाललेली असते. काल  शहर व परिसरात सकाळ पासूनच पतंगांची आकाशात गर्दी झाली होती. ठीक ठिकाणी कटी पतंग आकाशात तरंगत होत्या. त्याबरोबर तरुणाई उई  काप्या.. असा जल्लोष करीत होती .

तर गृहिनिंची दुपारपर्यंत देवळांत ओवसा करण्यासाठी लगबग सुरू होती. त्यानंतर ठुमकत मुरडत एकमेकिना औक्षण करून वानवशाची हास्य विनोदात  देवाण –घेवाण करत होती .  सायंकाळी आबाल वृद्ध परस्परांना तिळगूळ देवून गोड गोड बोलत एकमेकांना  शुभेच्छा देत होती,  गेले ४ दिवसांपासून बच्चे कंपनिचा आई –वडिलांकडे पतंग व मांज्यासाठी लाडिवाळ हट्ट सुरूच होता. तरुण मंडळी सुद्धा मंज्या सुताई ,चक्री आदीची खरेदीसाठी झुंबड उडाली. यावर्षी चीनी मंज्यावर बंदी असल्याने परांपरीक मंज्या सुताई कडे केल वाढला होता.  गृहिनिणी विविध वस्तु खरेदीसाठी गर्दी  केली होती. तरुणाई तर डीजे च्या तलवार उशिरापर्यंत धुंद होऊन पतंग उडविण्यात दंग होती . वर्षभरा पासून कोरोंना च्या धास्तीने कोणत्याही सणात एवढा उत्साह दिसला नाही, मात्र काल सर्वत्र मोठा जल्लोष जाणवला. फटक्याची आतषबाजी देखील केली गेली.  कोरोंनाला हद्दपार करत अत्यंत उत्साहात मकर संक्रांत  साजरी करण्यात आली .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या