Ticker

6/Breaking/ticker-posts

उत्तर भारत गारठला ; श्रीनगरचा 30 वर्षा चा रेकॉर्ड ब्रेक..

 


नवी
दिल्ली : उत्तर भारत  कडाक्याच्या थंडीनं अक्षरश: गोठलाय. संपूर्ण उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी पडलीय. सर्वात कठीण परिस्थिती जम्मू-काश्मीरमध्ये दिसून येतेय. इथं थंडीने गेल्या ३० वर्षांचा रेकॉर्ड तोडलाय. पहलगाम भागात पारा उणे १२ अंश सेल्शिअसपर्यंत पोहचलाय. तर गुलमर्गमध्येही तापमान उणे १० अंश सेल्शिअस नोंदवण्यात आलंय.

          श्रीनगरमध्ये तापमानानं गेल्या ३० वर्षांचा रेकॉर्ड तोडत सर्वात खालचा स्तर गाठलाय. गुरुवारी श्रीनगरमध्ये किमान तापमान उणे . अंश सेल्शिअस नोंदवण्यात आलंय. श्रीगनरमध्ये बुधवारी किमान तापमान उणे . अंश सेल्शिअस नोंदवण्यात आलं होतं. हे तापमान गेल्या वर्षांतील सर्वात कमी तापमान आहे. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी प्रशासनाला शहराच्या रस्त्यांवरून तत्काळ बर्फ हटवण्याचे आदेश देतानाच यामुळे फटका बसणाऱ्या नागरिकांना मदत पोहचवण्याचेही निर्देश दिलेत.

राजधानी दिल्लीमध्ये धुक्यानं रहिवाशांच्या आणि प्रवाशांच्या अडचणींत आणखीनच वाढ केलीय. रस्त्यावर अंधुकता असल्यानं गाड्यांचा वेग आपसूकच कमी झालेला दिसतोय. पहाटेच्या वेळी दिल्लीच्या वेगवेगळ्या भागांतील तापमानात कमालीची घट झालेली दिसून येतेय. पालम भागात पहाटे . अंश सेल्शिअस तर सफदरजंगमध्ये अंश सेल्शिअस तापमानाची नोंद करण्यात आलीय. जानेवारीनंतर पहिल्यांदाच दिल्लीतील पारा इतका खाली घसरला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढचे दोन-तीन दिवस याच पद्धतीनं वातावरण राहणार आहे. जानेवारी २०२१ रोजी दिल्लीत किमान तापमान . अंश सेल्शिअस नोंदवण्यात आलं होतं.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या