Ticker

6/Breaking/ticker-posts

कामात हलगर्जीपणा; ३५ बीएलओंना नोटीसा ..!


शहर मतदार संघातील विशेष सखोल पुनरीक्षण काम कासवगतीने


लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहिल्यानगर- विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातील ३५ अधिकारी व कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजविण्यात आल्या आहेत. यामध्ये ७ अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, ११ पर्यवेक्षक आणि १७ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा समावेश आहे.

दरम्यान या मतदारसंघातील २ लाख ८४ हजार ६३९ मतदारांना बीएलओंमार्फत प्रपत्राचे वाटप करण्यात आले आहे.  नगर शहर मतदारसंघातील विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमासाठी वर्ग दोन संवर्गातील ३६ अधिकार्‍यांची अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारीपदी, २९७ बीएलओ व ३० पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.  मतदार यादी नव्याने तयार करण्यासाठी ३ लाख १५ हजार २६४ मतदारांकडून गणना प्रपत्र भरून घेण्यासाठी घरोघरी जात आहेत . आतापर्यंत २ लाख ८४ हजार ६३९ मतदारांना गणना प्रपत्र वाटप करण्यात आले असून त्यापैकी १ लाख २५ हजार मतदारांनी ते भरून दिले आहेत.

दरम्यान या मतदारसंघातील १७ बीएलओ, ७ अतिरिक्त सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी व ११ पर्यवेक्षक अशा ३५ अधिकारी कर्मचार्‍यांचे काम मतदार संघातील एकूण सरासरी कामकाजापेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हे काम अत्यंत संथ झाले असून कासवगतीने सुरू आहे. याची गंभीर दखल नगर उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सुधीर पाटील यांनी घेतली असून या ३५ अधिकारी कर्मचार्‍यांना नोटिसा बजावल्या आहेत .त्यामुळे कर्मचार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या