Ticker

6/Breaking/ticker-posts

गणेश कारखान्याची निवडणूक लढविणार नाही; डॉ. सुजय विखे पाटील यांची घोषणा..!




लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

राहाता : गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी आम्ही गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पुन्हा लढविणार नाही. आमचे कार्यकर्तेही ती निवडणूक लढवणार नाहीत, अशी घोषणा केली. 

ऊस प्रश्नावर विरोधकांना प्रत्युत्तर देताना डॉ. विखे म्हणाले, ऊस कोणत्या कारखान्याला द्यायचा, हा निर्णय शेतकर्‍यांचा आहे. गणेश कारखाना आम्ही चालवत असताना इतर कारखान्यांनी आमच्या कार्यक्षेत्रातील ऊस पळविला होता. मग आता आमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या इच्छेनुसार ऊस देण्यास विरोध का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचा कोणत्याही व्यक्तीशी वैयक्तिक वाद नाही. कोपरगावमध्ये दोन आमदार झाले, त्याचा आनंदच आहे. त्यांनी विकासाची कामे करावीत. विरोधकांच्या भाषणांवर वेळ घालवण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या