ठरावाची फाईल दाबतो म्हणत २५ हजारांची लाच मागितलीः १० हजार स्वीकारताना रंगेहात अटक
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
कर्जत-कर्जत तालुक्यातील सहकारी संस्थांच्या कामकाजाला भ्रष्टाचाराची लागलेली कीड पुन्हा एकदा उघड झाली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भातील ठरावाची तक्रार दाबून टाकण्यासाठी तब्बल २५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कर्जतचे सहाय्यक निबंधक मिलिंद प्रल्हादराव राऊत (वय ५०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Aउइ) पथकाने १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.
तक्रार मिटविण्याच्या नावाखाली पैशांची मागणी तक्रारदार हे कर्जत तालुक्यातील एका विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आवश्यक ठराव संचालक मंडळाने मंजूर केला होता. मात्र एका संचालकाने त्या ठरावावर आक्षेप घेत सहाय्यक निबंधकांकडे तक्रार केली. ही तक्रार निकाली काढून ठरावाला अडथळा येऊ न देण्यासाठी आरोपी अधिकार्याने २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यापैकी १० हजार रुपये आधीच घेतल्यानंतर उर्वरित रकमेसाठी सातत्याने तगादा लावला जात होता. अखेर त्रस्त झालेल्या तक्रारदाराने ९ जुलै २०२६ रोजी Aउइ, अहिल्यानगर येथे तक्रार दाखल केली.
एसीबीने पडताळणी करून काल (१० जुलै) सापळा रचला. तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने सहाय्यक निबंधक मिलिंद राऊत यांना जागीच ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान आरोपीकडून लाचेचे १० हजार रुपये, खिशातील ५,०७० रुपये रोख तसेच ओप्पो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला. त्यांच्या राहत्या घराची झडतीही घेण्यात येत आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अंतर्गत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सौ. सविता तांबे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर करीत आहेत.
--------------

0 टिप्पण्या