लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहिल्यानगर : जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी काही अपवाद वगळता मतदान शांततेत आणि उत्साहात पार पडले. दुपारनंतर मतदारांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून मतदान केले. त्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू राहिले. त्यामुळे गेल्यावेळचा मतदानाचा टप्पा ओलांडला गेला आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बुधवारी (दि.२०) विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा जागांसाठी मतदारांनी उदंड उत्साहात अन शांतेत मतदान केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार जिल्ह्यात ७१.७३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अंतिम आकडेवारी आज जुळविली जाणार असून सरासरी सुमारे ७५ टक्क्यांच्या आसपास ती पोहचण्याची शक्यता आहे. मागील वेळेपेक्षा यावेळी अधिक मतदान होण्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू आहे. बुधवारी या निवडणुकीतील मतदानाची प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा पार पडला. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघाच्या जागांसाठी ३७६५ मतदान केंद्रांवर कडेकोट निगरणीत मतदानाची प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या दिशानिर्देशात आणि बारा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या संचालनात जिल्ह्यात अपवाद वगळता मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदार संघाच्य मतदार यादीत असलेल्या एकूण ३७ लाख ८३ हजार ९८७ मतदारांपैकी २३ लाख ४४ हजार ८९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.पाच वाजेपर्यंतच्या मतदानाची जिल्ह्यातील सरासरी ६२ % होती. नेवासे मतदारसंघात पाच वाजेपर्यंत सर्वाधिक म्हणजे ७०.४९ टक्के मतदान झाले होते. त्या खालोखाल कर्जत जामखेड ६६.५०, अकोले ६६.४०, कोपरगाव ६५.८०, शिर्डी ६४.७७, संगमनेर ६४.१३, राहुरी ६१.४० पारनेर ६१.१९,श्रीरामपूर ५८.४२, अहमदनगर शहर ५६.४३ आणि श्रीगोंदा ५५.४९ % मतदान झाले होते.
सायंकाळी पाचनंतर जिल्हा भरातील बारा विधानसभा मतदारसंघातील तब्बल २०० मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी आढळून आली. आयोगाच्या निर्देशानुसार सायंकाळी सहा वाजता मतदान केंद्रांचे दरवाजे बंद करण्यात आले. मात्र,वेळेपूर्वी मतदान केंद्रात मोठ्या संख्येने मतदारांच्या रांगा असल्यामुळे मतदान प्रक्रियेचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. निवडणूक प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार सायंकाळी पाचपर्यंतची आकडेवारी ही ७१.७३ टक्के एवढी आहे. यामध्ये सर्वांधिक मतदान हे नेवासा मतदारसंघात ७९.८९ आहे तर सर्वात कमी अहिल्यानगर सर्वात कमी म्हणजे ६३.८५ एवढे झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहातून जिल्ह्यातील ५० टक्के मतदान केंद्रांच्या वेब कास्टिंग प्रणालीद्वारे मतदान प्रक्रियेवर दस्तूर खुद्द जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ लक्ष ठेवून होते. जिल्हास्तरीय आचारसंहिता कक्षातून अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे समन्वय अधिकारी प्रकाश महाजन सिव्हिल पवर प्राप्त होणार्या आचारसंहिता संबंधित तक्रारीचा आढावा घेत होते.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या जिल्हा निवडणूक शाखेतून उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांची टीम मतदान प्रक्रियेविषयीच्या आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात रात्री उशिरापर्यंत व्यस्त होती. तर बारा मतदार संघातील मतदानाची प्रत्येक दोन तासाची आकडेवारी संकलित करण्याचे काम निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्या दिशानिर्देशात सुरू होते.एनआयसी शाखेतून जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गजानन नकासकर यांची टीम मतदान आकडेवारीची ऑनलाईन नोंद करण्यात व्यस्त होती.पोस्टल बेलेट मतदान प्रक्रियेसह निवडणूक विषयक महत्वाची बाबांची जबाबदारी उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बढे यांच्या निगराणीत सुरु होते.अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी उशिरा मतदारांची गर्दी झाल्याने मतदारसंघनिहाय मतदानाची अंतिम आकडेवारी मिळण्यास विलंब झाला होता.मतदानाची अंतिम आकडेवारी संकलित करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ मतदारसंघासाठी निवडणुकीच्या रिंगणात एकूण १५१ उमेदवार आहेत.बुधवारी झालेल्या मतदान प्रक्रियेतून या उमेदवारांचे निवडणूक विषयीचे भवितव्य ईव्हीएम बॉक्समध्ये बंदिस्त झाले आहे.शनिवारी ( दि.२३ नोव्हेंबर) १२ विधानसभा मतदारसंघात निश्चित करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रात होणार्या मतमोजणीतून या उमेदवारांच्या आमदार’ होण्याच्या संकल्पचा निकाल लागणार आहे.
मागील वेळेपेक्षा अधिक मतदान
विधानसभेच्या मागील सन २०१९ च्या पंचवार्षिक निवडणुकीत जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघासाठी एकूण ७० टक्के मतदान झाले होते.यावेळी जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या संकल्पनेतून उच्चांकी मतदान करण्याचा संकल्प निवडणूक प्रशासनाने केला.पाचवाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहता हि मागील विधानसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारीपेक्षा अधिक ७१.७३ झाली आहे. त्यात आणखी २-३ टक्क्ंयाची वाढ होण्याची शक्यता असल्याने गेल्यावेळचा उच्चांक मोडला जाणार आहे.
प्रशासनाने जागवली रात्र
सायंकाळी उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर असलेले मतदान विषयक ईव्हीएम बॉक्स आणि इतर साहित्य घेऊन पथके कडेकोट बंदोबस्तात निश्चित करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रांकडे रवाना झाली. मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी,अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, निवडणूक उपजिल्हाधिकारी, जबादारी सोपविलेले अन्य उपजिल्हाधिकारी, सर्व तहसीलदार नायब तहसीलदार, निवडणूक विषयक जबाबदारी असलेले अधिकारी-कर्मचारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला संचालनात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी-जवान यांचे मतदान केंद्रात मतदान विषयक साहित्य जमा होईतो रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरूच होते. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत प्रशासनाची रात्र गेली.
0 टिप्पण्या