Ticker

6/Breaking/ticker-posts

मतदान केंद्रात व्हिडिओ चित्रीकरण करून व्हायरल केले ; रांजणीतील एका विरुद्ध गुन्हा दाखल


                          

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

शेवगाव ( विशेष प्रतिनिधी ) : मतदान केंद्रात मतदान करतानाचा व्हिडिओ बनवून तो व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल केल्याप्रकरणी २२२, शेवगाव विधानसभा मतदार संघातील रांजणी ( ता.शेवगाव ) येथील भारत औटी याचे विरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात दहिगाव -  ने सेक्टरचे झोनल अधिकारी सारंग दुगम यांनी फिर्याद दाखल केली आहे.   
                                        
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मौजे रांजणी येथील मतदान केंद्रावर भारत औटी या इसमाने बुधवार दि.२१ रोजी सकाळी मतदान करताना व्हिडिओ बनवून तो गावचं राजकारण या व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल केला. 

यासंदर्भात नारायण घुले यांनी निवडणूक विभागाकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दहिगाव - ने चे झोनल अधिकारी सारंग दुगम यांचेशी संपर्क साधून याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने दुगम यांनी रांजणी येथे जाऊन  मतदान केंद्राध्यक्ष रविन्द्र जमादार यांच्याशी चर्चा केली. तसेच घडलेल्या बाबींची खातरजमा केली असता तक्रारदारांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आल्याने भारत औटी विरुद्ध जिल्हा दंडाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशान्वये आचारसंहिता भंग व कायदेशीर आदेशाची अवज्ञा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक समाधान नागरे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या