Ticker

6/Breaking/ticker-posts

माध्यमिक शिक्षक दीपक झाडे यांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

 









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

    शेवगाव  : सामनगाव, ( ता. शेवगाव ) येथील माध्यमिक शिक्षक दीपक सूर्यभान झाडे ( वय ४८ ) यांचा गुरुवारी ( दि. २४ रोजी ) ढोरा नदीवरील बंधाऱ्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. ते सकाळी मित्रांसमवेत बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. 


सहकारी मित्रांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. सामनगाव सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन तथा निवृत्त प्राथमिक शिक्षक सूर्यभान झाडे यांचे ते सुपुत्र होत. त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

      

स्व. झाडे हे महालक्ष्मी हिवरे, ( ता. नेवासा ) येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून सेवेत होते. विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी त्यांची ख्याती होती. ते शांत, संयमी व मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी तसेच मुलगा व मुलगी असा परिवार आहे. यासंदर्भात शेवगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या