लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहिल्यानगर दि. २५- विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने अवैध मद्य, रोकड वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी अहमदनगर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी चेकपोस्ट, आठ भरारी व स्थाई पथके नेमण्यात आली आहेत. भरारी पथकाने अहिल्यानगर शहरात दोन ठिकाणी वाहतूक करण्यात येत असलेली रोकड पंचनामा करुन ताब्यात घेतली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली.
भरारी पथकाने १६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता नालेगाव भागातील अमरधाम येथे ३ लाख ८४ हजार ३०० रुपये एवढी रोख रक्कम दोन पंचासमक्ष पंचनामा करुन ताब्यात घेतली. याबाबतचा तपास कोतवाली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षककरीत आहेत.
कायनेटीक चौक येथे २४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास काळ्या रंगाचे वाहन क्र. एमएच १९ ईजी ६३११ हे संशयित वाटल्याने वाहनास थांबविण्यात आले. झडती नंतर वाहनाचे चालक आणि सोबतच्या व्यक्तीकडून १ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम मिळाली. वाहनाची व रक्कमेची विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांना रक्कमेबाबत २४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत खुलासा व पुरावा सादर करण्याबाबत लेखी समजपत्र देण्यात आले आहे. पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचेही कळविण्यात आले आहे.
0 टिप्पण्या