Ticker

6/Breaking/ticker-posts

डॉ.सुजय विखे पाटील आपल्या हक्काचा माणूस..!


लोकनेता  न्यूज

    (ऑनलाईन न्यूज नेटवर्क )      शेवगाव : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील हा आपल्या हक्काचा माणूस आहे.आपले प्रश्न सोडविण्याचा शब्द त्यांनी दिला आहे.त्यामुळे त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा. असे आवाहन माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी केले.
.
     वरुर,(ता.शेवगाव) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या सहविचार सभेत मार्गदर्शन करताना श्री.घुले बोलत होते.ते पुढे बोलताना म्हणाले, देशात तसेच राज्यात अलीकडच्या काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. आपण आपल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.श्री.पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांना विजयी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीप्रमाणे बुथनिहाय मतदान घडून आणावे व डॉ.विखे यांना मोठे मताधिक्य द्यावे. 

    आपल्या परिसराचे अनेकविध प्रश्न सोडविण्याचा शब्द डॉ.सुजय विखे पाटील तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्याचे सांगून श्री.घुले म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर प्राधान्याने ताजनापूर प्रश्नी जलसंपदा मंत्राच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे पालकमंत्र्यांनी मान्य केले आहे.

       याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, युवराज नरवडे उपस्थित होते.यावेळी सर्वश्री काकासाहेब नरवडे,वामनराव म्हस्के,माणिक म्हस्के,बप्पासाहेब लांडे,आदिनाथ लांडे,काकासाहेब लबडे,भागवत लव्हाट,सुधीर म्हस्के,आप्पासाहेब भुजबळ आदींची समायोचित भाषणे झाली.सहविचार सभेसाठी वरुर पंचक्रोशीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या