Ticker

6/Breaking/ticker-posts

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.निलेश लंके यांच्या प्रचारार्थ वरुरला भव्य प्रचार फेरीलोकनेता  न्यूज

    (ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

     शेवगाव : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ.निलेश लंके यांना शेवगाव तालुक्यात  पाठिंबा मिळत असून त्यांनी दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे.वरुर,(ता.शेवगाव)येथे काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
       ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख श्री.शरद पवार यांची ग्रामीण जनतेशी नाळ जुळलेली असून त्यांना सर्व प्रश्नांची जाण आहे.त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच देशाचे संरक्षणमंत्री व कृषीमंत्री म्हणून केलेले काम नेत्रदीपक आहे.श्री.पवार यांच्या नेतृत्वाखाली राजकीय,सामाजिक क्षेत्रात काम करत असलेले पारनेरचे आमदार डॉ.लंके हे तगडा लोकसंपर्क असलेले सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार असल्याने त्यांच्याप्रती मतदारांमध्ये स्नेह व आपुलकीची भावना आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचारार्थ वरुरमध्ये कार्यकर्त्यांनी ' स्वयंस्फूर्तीने हाऊस टू हाऊस ' प्रचार फेरी काढून मतदारांशी थेट संवाद साधला.

      या रॅलीत सर्वश्री सुनील म्हस्के, प्रवीण म्हस्के, रामभाऊ लव्हाट, दादासाहेब शिंदे, भास्कर वावरे, निसारभाई पठाण, बनेखा पठाण, मुकुंद लव्हाट, नंदू कर्डिले, सुरेश वावरे, भारत म्हस्के, मिया शेख, हमीद शेख, बालू सोनटक्के, सोमेश्वर शिंदे, राहुल लव्हाट, चेतन शिंदे, राजू वावरे, दीपक खैरे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या