Ticker

6/Breaking/ticker-posts

श्री क्षेत्र भगवानगड दिंडीचे पैठणकडे प्रस्थान..लोकनेता  न्यूज

    (ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

भगवानगडश्री क्षेत्र भगवानगडाच्या दिंडीचेही गुरूवारी महंत न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्थान झाले आहे .भगवानगडाचे शांतीब्रम्ह पैठणच्या शांतीब्रम्हाच्या दर्शनाला निघाले .


सांप्रदायाच्या कलशस्थानी असलेले संत तुकाराम महाराज यांचा सदेह वैकुंठगमन सोहळा म्हणजेच बीज व शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांची नाथषष्ठी  असा हा पर्वकाळ मानला जातो ,देहूचा सोहळा आटोपुन आता नाथषष्ठीसाठी वारकरी पैठणकडे जात आहेत ,तालुक्यातून अनेक दिंड्या पैठणकडे जात असल्याचे दिसून येते ,


हजारो भाविक भानुदास एकनाथ भजन करत कडाक्याचे ऊन असुन देखील त्याची पर्वा करता वारकरी पैठण कडे मार्गस्थ झाले आहे .


पालखी रस्त्याची दैना कायम !

पैठण पंढरपुर हा पालखी महामार्ग पाच वर्ष झाले तरी पुर्णत्वास न गेल्याने जागोजागी त्रासाचा ठरत असल्याने त्याची दैना कायमच असल्याने वारक-यातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या