लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर:- विविध हक्क वंचित समूहातील
विद्यार्थ्यांना रोजगार आणि उच्च शिक्षणाची संधी मिळावी ,यासाठी विद्या
सहयोग शिष्यवृत्तीची घोषणा स्नेहालय परिवारातर्फे करण्यात आली. शिक्षण पूर्ण झाल्यावर संबंधित विद्यार्थ्यांनी या मदतीची बिनव्याजी
परतफेड करावयाची आहे. करोना संकटामुळे ज्या गरीब
कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित झाले, त्यांना
या योजनेमुळे आपले उर्वरित शिक्षण पूर्ण करणे शक्य होणार आहे.
सर्व जातीधर्मातील अनाथ-लालबत्ती विभाग ,झोपडपट्ट्यांमध्ये, विविध अनाथ आश्रमातून राहणारी बालके, दिव्यांग-एचआयव्ही बाधित-बाल मजुरी आणि लैंगिक शोषणातून मुक्त
बालकांना-बालविवाह मुक्त मुली
- बाल माता यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु याशिवाय कुठल्याही आर्थिक
दुर्बल घटकातील बालक अथवा युवकांनाही या योजनेतून
शिक्षणासाठी अर्थ सहयोग दिला जाणार आहे.
समाजसेवा ,वैद्यकीय, अभियांत्रिकी ,फार्मसी ,कायदा ,व्यवस्थापन,नर्सिंग आदी अभ्यासक्रमात जर शासकीय कोट्यातून कोणी गुणवत्तेवर प्रवेश
मिळवला असेल ,तर अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क या
उपक्रमातून भरले जाईल. परंतु खाजगी शिक्षणसंस्थांमध्ये आणि देणगी भरून शिक्षण घेणाऱ्यांना या उपक्रमातून विद्या सहयोग मिळणार नाही. निवास-भोजनाच्या सुविधांबाबत विद्या सहयोग टीम मार्गदर्शन देईल.
.
कॅनडा येथील उद्योजक टॉम लेविट, पुणे येथील सॅप
पार्ट या कंपनीचे संचालक प्रसाद कुलकर्णी , मुंबई
येथील रमेश कचोलिया आणि केअरिंग फ्रेंड्स नेटवर्क , यांनी या उपक्रमासाठी प्राथमिक आर्थिक सहयोग दिलेला आहे. याशिवाय अनेक व्यक्तिगत दात्यांनी गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मदत
देण्याची तयारी दर्शविली आहे.
यंदाच्या वर्षी सुमारे ५० लक्ष रुपये
विद्या सहयोग म्हणून वितरीत करण्याचे उद्दिष्ट आहे. येत्या १० मार्च पर्यंत या
उपक्रमांतर्गत आर्थिक सहयोग मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन राजीव गुजर, संजय गुगळे, अजित माने ,अजित कुलकर्णी,अनंत झेंडे, अनिल गावडे, जयकुमार मुनोत, हनीफ शेख , फारूक बेग,सचिन खेडकर ,प्रवीण
मुत्याल ,राजेंद्र शुक्रे ,राजीव
कुमार सिंग, अॅड शाम आसावा , डॉ.कृष्णा पाटील, प्रा.प्रमोद तांबे , डॉ.दया भोर,डॉ.अंकुश आवारे यांच्या ‘विद्या सहयोग’ समन्वय समिती ने केले आहे.
या संदर्भातील अर्ज पुढील पत्त्यावर
उपलब्ध आहेत.
१. स्नेहालय सिटी ऑफिस, गांधी मैदान अहमदनगर,
जयप्रकाश संचेती ९२२६७६१४०५
२. स्नेहालय प्रतिसाद केंद्र, अडकर संकुल, बालिकाश्रम रस्ता, सचिन वाघ ७८२२९७४८९९/सीमा
गंगावणे-९५८८६२००३६
३. स्नेहालय, एफ ब्लॉक, प्लॉट नंबर २३९, सुपर अमोनिया प्लांट जवळ, एमआयडीसी अहमदनगर ४१४१११, संजय चाबुकस्वार
९३७०६९६९६८
४. महामानव बाबा आमटे विकास सेवा संस्था, घुगलवडगाव,
५. फारूक बेग, कर्जत ९४२३७८८४६५
यासंदर्भात अधिक माहितीसाठी या क्रमांकावर
संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या