Ticker

6/Breaking/ticker-posts

सुजय विखे पाटील यांनी घेतले आचार्य श्री.कुंदनऋषीजी महाराज यांचे आशीर्वाद
लोकनेता  न्यूज

    (ऑनलाईन न्यूज नेटवर्क )


अ. नगर, २९ मार्च २०२३

नगर जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्रसंत आचार्य श्री.आनंदऋषीजी महाराज यांच्या ३२ व्या स्मृतीदिनानिमित्यलोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आनंद धामला भेट देऊन जैन समाजाचे गुरू संत श्री. कुंदनऋषीजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले.

  राष्ट्रसंत आचार्य श्री.आनंदऋषीजी महाराज यांच्या ३२ व्या स्मृतीदिनानिमित्य नगर शहरात व  जिल्ह्यात रक्तदान शिबिरसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


 सकाळी स्टेशन रोड ते आनंदधाम आश्रम पर्यंत शांती मार्च चे आयोजन करण्यात आले होते. या मार्च मध्ये सुजय विखे पाटील यांनी सहभाग  नोंदविला. त्यानंतर त्यांनी आनंदधाम येथे कुंदनऋषीजी महाराज यांचे आशिर्वाद घेतले. तसेच या प्रसंगी आयोजित रक्तदान शिबीराला भेट देत रक्तदात्यांचे अभिनंदन केले. आनंदधाम येथे येणाऱ्या भाविकांना शरबत वाटून सेवाकार्यात भाग घेतला. जैन समाजाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुजय विखे पाटील यांचा यावेळी सत्कार करत त्यांना आचार्य श्री.आनंदऋषीजी महाराज यांचे तैलचित्र भेट दिले. 

 या प्रसंगी आमदार संग्राम जगाताप याच्यासह जैन समाजाचे प्रतिनिधी, हस्तीमल मनोद, अभय आगरकर,  वसंत लोढा, प्रेमजी बोथरा, संतोष बोरा, बाबूसेठ कवरा, निखील लोढा आदी  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या