Ticker

6/Breaking/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शेवगाव तालुकाध्यक्षपदी हरीश भारदे तर, कार्याध्यक्षपदी माधव काटे ..!लोकनेता  न्यूज

    (ऑनलाईन न्यूज नेटवर्क )


शेवगाव : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी येथील भारदे साक्षरता प्रसारक मंडळाचे सहसचिव हरीश भारदे यांची तर, कार्याध्यक्षपदी बोधेगाव येथील संघर्षयोद्धा श्री बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन माधव काटे यांची निवड करण्यात आली.


अहमदनगर येथे (शनिवारी) राष्ट्रवादी भवनात पार पडलेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.प्रदेश सरचिटणीस अँड.प्रताप ढाकणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते श्री.भारदे व श्री.काटे यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.दरम्यान, लोकसभेची निवडणूक व त्यातच होळी सणाच्या पूर्वसंध्येला या निवडी जाहीर झाल्याने लोकसभेचा होलिकोत्सव रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
       बैठकीस ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, पाथर्डीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, बंडू पाटील बोरुडे, शेवगावचे माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, माजी सरपंच एजाज काझी, राहुल मगरे, बाळासाहेब डाके, शरद सोनवणे, प्रकाश दहिफळे, शिरीष काळे आदी उपस्थित होते.


     राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, कार्याध्यक्ष खा.सौ.सुप्रिया सुळे व प्रदेश सरचिटणीस अँड.प्रताप ढाकणे यांचे नेतृत्वाखाली शेवगाव तालुक्यात पक्ष बांधणी करून संघटना अधिक मजबूत करण्याबरोबरच जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील,अशी ग्वाही नूतन पदाधिकाऱ्यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या