Ticker

6/Breaking/ticker-posts

' धाकटी पंढरी ' वरुरला शिवजन्मोत्सवाच्या भव्य सोहळ्याचे आयोजन




लोकनेता  न्यूज

    (ऑनलाईन न्यूज नेटवर्क)



     

शेवगाव : ' धाकटी पंढरी ' असा सर्वदूर लौकिक असलेल्या श्रीक्षेत्र वरुर,(ता.शेवगाव)येथे यंदा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सलग चार दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्ताने वकृत्व स्पर्धा,खेळ पैठणीचा, सांस्कृतिक कार्यक्रम व भव्य शोभायात्रा आदी कार्यक्रम पार पडणार आहेत.या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन आनंद लुटावा,असे आवाहन सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


      शुक्रवार दि.१६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी वकृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत.माझ्या स्वप्नातील गाव,राम मंदिर की राष्ट्र मंदिर,कथा एका संताची,राजा शिवछत्रपती, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आदी विषय स्पर्धेसाठी ठेवण्यात आले आहेत.प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यांचा आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात येणार आहे.नाव नोंदणीसाठी निलेश मोरे व गणेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


       शनिवार दि.१७ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता खास महिलांसाठी ' होम मिनिस्टर ' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या महिला भगिनींचा अनुक्रमे पैठणी व एक ग्रॅम सोन्याची नथ,पैठणी व अर्धा ग्रॅम सोन्याची नथ तसेच पैठणी व चांदीचे पैंजण देऊन सन्मान करण्यात येणार आहे.या प्रेक्षणीय व दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन सोमेश्वर शेळके करणार आहेत.


     रविवारी १८ तारखेला संध्याकाळी साडेसहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रमानंतर शानदार बक्षीस वितरण होणार आहे.सोमवारी (दिं १९ रोजी) सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन व भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.तर, सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई बरोबरच भव्य मिरवणूक काढण्यात येईल.मिरवणूक मार्गावर सडा,रांगोळ्या काढण्यात येतील.' न भूतो न भविष्यती ' असा शिवजन्मोसवाचा सोहळा साजरा करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी शिवप्रेमी युवक परिश्रम घेत आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या