Ticker

6/Breaking/ticker-posts

२ व ३ मार्च रोजी अहमदनगर ग्रंथोत्सवाचे आयोजन

 पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते उद्घाटन

विविध कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी 

ग्रंथालय पदाधिकारी व तमाम नगरकर नगरकरांनी उपस्थित राहावे,- प्र 

ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांचे आवाहन लोकनेता  न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर : उच्च व तंत्र  शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील  ग्रंथालय संचालनालयामार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत ग्रंथोत्सव हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अहमदनगर ग्रंथोत्सवाचे आयोजन   दि.शनिवार व रविवार दिनांक  3 मार्च 2024 रोजी करण्यात आले आहे. 

अहमदनगर ग्रंथोत्सव 2023 चे उद्घाटन मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील,‍ मंत्री,महसुल  पशुसंधन दुग्धव्यवसाय विकास, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री,  अहमदनगर यांच्या हस्ते सकाळी   11.00 वा. भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह  सामाजिक  न्याय भवन , सावेडी  संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजय कळमकर हे भुषविणार आहे. तर , प्रमुख पाहुणे म्हणून खा. डॉ. सुजय विखे पाटील, आ. किशोर दराडे, आ. प्रा. राम शिंदे, आ. सत्यजीत तांबे, आ. बाळासाहेब थोरात,आ. बबनराव पाचपुते, आ. शंकरराव गडाख  आ. श्रीमती  मोनिकाताई  राजळे, आ. संग्राम जगताप, आ. आशुतोष काळे, आ. प्राजक्त तनपुरे,आ. डॉ. किरण लहामटे, आ. लहु कानडे,आ. निलेश लंके, आ. रोहित  पवार, जिल्हाधिकारी  सिध्दाराम सालीमठ (भा.प्र.से.) प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहाय्यक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या प्रसंगी  साहित्यिक व आदर्श वाचकांचा गौरव करण्यात येणार आहे.

ग्रंथ दिंडीचे आयोजन 

या ग्रंथोत्सवानिमित्त  शनिवार दि.2 मार्च 2024 रोजी सकाळी 9.00 ग्रंथ दिंडीचे  आयोजन केले आहे. या ग्रंथदिंडीचा शुभारंभ समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, राधाकिसन देवढे  यांच्या शुभ हस्ते व जिल्हा परिषद माध्यमिक  शिक्षणाधिकारी,  अशोक कडूस, हिंद सेवा मंडळ व अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष  प्रा. शिरीष मोडक  यांच्या  प्रमुख उपस्थितीत रेणाविकर माध्यमिक विदयालय, सावेडी, अहमदनगर येथे संपन्न होणार आहे. ही ग्रंथ दिंडी सावेडी नाका मार्गे  जाणार असून भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह  सामाजिक  न्याय भवन , सावेडी  येथे समारोप  होणार आहे. 


अहमदनगर ग्रंथोत्सव 2023 च्या माध्यमातून अहमदनगर  जिल्ह्यातील  साहित्यिक, ग्रंथप्रेमी, ग्रंथविक्रेते, रसिक  वाचक, नागरिक यांना  ग्रंथ हाताळण्याची, वाचनाची व खरेदी करण्याची  संधी उपलब्ध झालेली आहे.या मध्ये शासकीय प्रकाशन, बालभारती पाठ्यपुस्तक मंडळ ,तसेच विविध  प्रकाशक, विक्रेते यांचे दर्जेदार ग्रंथ  सवलतीच्या दरात वाचकांना खरेदी करण्याची संधी रसिक  वाचकांना उपलब्ध होणार आहे  तसे विविध एकपात्रीप्रयोग व कविसंमेलनातून दोन दिवस मनोरंजन व ज्ञानाचे  आदान प्रदान होणार आहे. या मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रतिनिधी   शाळा महाविद्यालयाती  विद्यार्थी, शिक्षक , प्राध्यापक , साहित्यिक सहभागी   होणार आहे व सर्व रसिक  नागरिकांनी या सुवर्ण संधीचा आवश्य लाभ घ्यावा. असे अवाहन प्र. ग्रंथालय संचालक तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी  अशोक गाडेकर यांनी केले आहे.


या प्रसंगी दुपारी १२.०० मा.कुसुमाग्रज उर्फ वि.वा.शिरवाडकर लिखित नटसम्राट या नाटकाचा एकपात्री प्रयोग श्री.फुलचंद नागटिळक, कवी व सिनेअभिनेते सोलापूर हे सादर करणार  आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाराष्ट्र शासन मराठी भाषा  सल्लागार समितीचे सदस्य, श्री. जयंत येलूलकर तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक, वक्ता व  लेखक व श्री . एन. बी. धुमाळ हे उपस्थित राहणार आहेत.दुपारी ३.०० वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त  शिवचरित्रावर बीड येथील श्री. गणेश भोसले यांचे व्याख्यान होणार आहे.


  रविवार दि. ३ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वा. निमंत्रीत कवींचे  कविसंमेलन होणार असून अध्यक्ष स्थान ज्येष्ठ कवी श्री. चंद्रकांत पालवे व प्रमुख पाहुणे म्हणून शब्ध गंध साहित्यक परिषदेचे अध्यक्ष ,राजेंद्र उदागे, ज्येष्ठ कवी  प्रा. शशिकांत शिंदे, उपस्थित राहणार आहेत.

दुपारी २.०० वा. आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम  अधिकारी  (निवृत्त) बाबासाहेब खराडे  यांचा कविता आणि विनोदावर आधारीत एकपात्री कार्यक्रम  “हसण्यासाठी जन्म आपुला” संपन्न होणार आहे.

दुपारी ३.३० वा. समारोपाचा कार्यक्रम होणार असून या समारंभाच्या अध्यक्ष स्थानी उपजिल्हाधिकारी भुसंपादन श्री. हिरामण झिरवाळ हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी, दिपक दातीर, जिल्हा कोषागार अधिकारी, श्रीमती भाग्यश्री जाधव व भोसले, जिल्हा माहिती अधिकारी, डॉ. रविंद्र ठाकुर, जिल्हा परिषद सहा.शिक्षण उपनिरीक्षक, श्रीराम थोरात आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी आदर्श वाचकांचा गौरव करण्यात येणार आहे.


ग्रंथप्रेमीना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत यासाठी तसेच  प्रकाशक व ग्रंथविक्रेते यांना  ग्रंथ विक्रीसाठी एकाच ‍ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी हा ग्रंथमहोत्सव आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. ग्रथोतसवाच्या यशस्वीते साठी अहमदनगर ग्रंथोत्सव 2023 समन्वय समिती सदस्य व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहमदनगर येथील सर्व कर्मचारी वृंद प्रयत्नशिल आहेत.

-----टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या