Ticker

6/Breaking/ticker-posts

महाराष्ट्र पब्लिक स्कूल व जूनियर कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरालोकनेता  न्यूज

   (ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


नगर : दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी माजी महापौर माननीय श्री. बाबासाहेब वाकळे व सावेडी विभागाचे नगर सेवक श्री. रवींद्र बारस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


आजच्या या ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण प्रसंगी माजी महापौर बाबासाहेब वाकडे पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या ध्वज संचलन व परेड याबद्दल अतिशय कौतुक केले आणि ७५ वर्षे आपल्या राज्यघटनेला झाल्याबद्दल सर्वांनी राज्यघटनेच्या नियमांचे पालन करावे देशाच्या प्रगतीमध्ये प्रत्येकाने हातभार लावा आणि देशाबरोबर आपणही मोठे व्हावे ही सदिच्छा व्यक्त केली. 


कार्यक्रमास महाराष्ट्र तांत्रिक शिक्षण मंडळ चे संस्थापक श्री अंकुश दराडे, संचालिका सौ. स्वाती आव्हाड-दराडे, मुख्याध्यापक श्री. सुशांत सामलेटी, प्रशासक श्री. प्रणव दराडे उपस्थित होते. 


विद्यार्थ्यांनी पथ संचलन, विविध नृत्य, माईम नाटक इत्यादी मनोरंजक कार्यक्रम सादर केले. पालकानी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली.


सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सफल करण्यासाठी मेहनत घेतली त्याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. सौ. श्रुती पिंपळीकर यांनी सूत्रसंचालन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या