Ticker

6/Breaking/ticker-posts

आश्रुबा सांगळे यांचे निधन; शुक्रवारी दि. 10 रोजी नगर येथे दशक्रिया विधी

आश्रुबा सांगळे यांचे निधन; शुक्रवारी नगर येथे दशक्रिया विधी 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )


नगर:  करेवाडी (ता. आष्टी) येथील मुळ रहिवाशी, 
 निष्ठावान शेतकरी आश्रुबा चुडाजी सांगळे यांचे बुधवार दि. 10 रोजी नगर येथील निवासस्थानी सकाळी वृद्धापकाळाने ( वय- 85 वर्षे) निधन झाले . 

त्यांच्या पश्चात पत्नी, 1 भाऊ,  1 बहीण, 2 मुले, 1 मुलगी, सुना, जावई, नातवंडे,पुतणे असा मोठा परिवार आहे. 

अत्यंत शांत, संयमी आणि मितभाषी स्वाभामुळे ते नगरममध्ये  'दादा' या आदरार्थी नावाने परिचित होते. 

 त्यांच्या पार्थिवावर येथील नालेगाव अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.  यावेळी नगरसेवक विनित पाऊलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, गोविंद सांगळे, नवनाथ बडे, म्हातारदेव पालवे, यांच्यासह नातेवाईक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  पत्रकार पोपट सांगळे यांचे ते वडील होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या