Ticker

6/Breaking/ticker-posts

गणरायाला निरोप देत, शेवगाव पोलीस कर्तव्यावर रुजू

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

   

  शेवगाव : 24 तास कर्तव्यावर असूनही जनतेच्या सुरक्षेसाठी विघ्नहर्ता गणेशाची प्रतिष्ठापना करून गेली दहा दिवस नित्यनेमाने पूजाअर्चा, आराधना केलेल्या शेवगाव पोलीस स्टेशनच्या आवारातील श्रीदत्त मंदिरात विराजमान गणरायाला पोलीस अधिकारी,अंमलदार तसेच गृहरक्षक दलाच्या जवानांनी भावपूर्ण निरोप दिला.
     पोलीस निरीक्षक विलास पुजारी,सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, दीपक सरोदे, पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील,अमोल पवार यांचे उपस्थितीत गणरायाची सामुदायिक आरती झाल्यानंतर गणरायाला विसर्जनासाठी मार्गस्थ करण्यात आले.


     पोलीस व्हॅनच्या बोनटवर विराजमान देखण्या गणेश मूर्तीचे गुरुवारी सकाळी वाजत गाजत जोहरापूरच्या ढोरानदी पात्रात विसर्जन करण्यात आले. लाडक्या बाप्पाला निरोप देताना अधिकारी,अंमलदारांचे डोळे पानावले.विसर्जन मिरवणुकीत सहभागी सर्व अधिकारी, अंमलदारांनी भगवे फेटे परिधान केले होते.पोलीस स्टेशन मधील गणेशाचे विसर्जन करून सर्व अधिकारी व अंमलदार शेवगाव शहरातील सार्वजनिक गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीसाठी कर्तव्यावर रुजू झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या