लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव :
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नागरिकांमध्ये मतदान विषयक जनजागृती होण्यासाठी शेवगाव तहसील कार्यालयाच्या वतीने सध्या मतदार जागृती अभियान सुरू असून, स्वीप समितीच्या वतीने येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूलच्या रावसाहेब पटवर्धन सभागृहात विविध शाळा व महाविद्यालयातील युवतींनी काढलेल्या मतदान जागृती विषयक संदेश देणाऱ्या रांगोळ्यांचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते.
मतदान करण्याचे फायदे तोटे, निस्पृह मतदान, देशाच्या विकासात मतदानाचे महत्व, लोकशाहीचा मंगल उत्सव असे संदेश देणाऱ्या रांगोळ्या पाहण्यास नागरिकांनी गर्दी केली होती. आदर्श विद्या मंदिर, पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कुलमधील विद्यार्थिनींनी यात सहभाग घेतला. प्रदर्शनाचे उद्घाटन तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी नायब तहसीलदार राजेंद्र बकरे, नायब तहसीलदार गौरी कट्टे, शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ, जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक रमेश गोरे, नितीन मालानी, वसीम शेख यांनी प्रदर्शनाचे नेटके आयोजन केले. मतदार जागृतीसाठी समिती तर्फे लवकरच मतदान जागृतीविषयक रिल्स निर्मिती स्पर्धा घेतली जाणार असल्याचे श्रीमती राऊळ यांनी सांगितले.
0 टिप्पण्या