Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्ह्याच्या विकासात आ.बबनराव पाचपुते यांचे मोठे योगदान : खा. डॉ. सुजय विखे पाटील

 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

श्रीगोंदा (प्रतिनिधी) :-आ.बबनराव पाचपुते यांनी कार्यकर्त्यांच्या जीवावर सर्व संकटांवर मात करत तालुक्याच्याच नाही तर जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान दिले असल्याचे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.


माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आ. बबनराव पाचपुते यांच्या सपत्नीक सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.  यावेळी काष्टी येथे आयोजित राष्ट्रीय वयोश्री योजना आणि दिव्यांग साहित्याचे देखील वाटप करण्यात आले.

   पुढे खा. विखे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाच्या आराखड्यात ज्या चार- पाच जणांनी योगदान दिले, त्यांच्यात आ. बबनराव पाचपुते यांचे नाव अग्रभागी आहे. आ.पाचपुते यांनी आपल्या माध्यमातून अनेक लोकांना मोठे केले. जिल्ह्याच्या विकास कामात त्यांनी प्रामुख्याने रस्त्यांच्या बाबतीमध्ये कोणीच न पाहिलेले स्वप्न म्हणजे काष्टी -जामखेड रस्त्याचे काम केले. हा रस्ता जवळपास पूर्ण होत असून एका तासात जामखेड काष्टी रस्त्याने आता जाता येणार आहे, लिंपणगाव रेल्वेगेट वरील उड्डाणपुलासाठी ६० कोटी रुपये मंजूर केले आहे. येत्या १५ दिवसात या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होईल. अवघ्या एका वर्षात हे काम पूर्ण करणार असल्याचे सांगत तालुक्याचा विकास हा आश्वासनांचा नसून डोळ्याने दिसणारा असल्याचे सांगितले.


 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील वयोश्री योजना आणि दिव्यांग साहित्य वाटप हे आ.पाचपुते यांनी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय दिला असल्याने त्यांच्या वाढदिवशी वाटप केले असल्याचे खा.विखे यांनी सांगितले. पीक पाहणीसाठी कालावधी थोडा राहिला असून या योजनेत कोणताच शेतकरी मागे राहू नये,यासाठी येत्या १० दिवसात तालुक्यातील राहिलेल्या शेतकऱ्यांची पीक पाहणी करून घेण्यात येईल . राजकरण करीत असताना काही लोक फक्त अंत्यविधी, दशक्रिया विधी, लग्न सोहळे , साखरपुडा, वर्ष श्राद्ध यासाठी दिवसदिवस घालवतात मात्र मी तसे न करता दिल्लीत बसून कामे मंजूर करून घेतो आणि विकास कसा करता येईल याचे नियोजन करतो . आम्ही भाजप बरोबर काम करत असून आमदार बबनराव पाचपुते यांच्या बरोबर आहोत काही झाले तरी पाचपुते यांच्या खांद्याला खांदा लावून विखे कुटुंब तुमच्या बरोबर आहे अशी ग्वाही खा  विखे यांनी दिली.


भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते  प्रास्ताविकात  सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाना आधार देऊन त्यांचा स्वाभिमान वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यासाठी संपूर्ण भारतात निःशुल्क साहित्य वाटप करण्यात येत आहे . दिव्यांग व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही , त्यांनी नाराज न होता नाव नोदणी केल्यावर त्यांनाही लाभ देण्यात येईल.

सूत्रसंचालन भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी केले.

यावेळी नागवडे कारखान्यांचे माजी उपाध्यक्ष केशव मगर, डॉ.प्रतिभा पाचपुते, भगवानराव पाचपुते, ॲड.प्रतापसिंह पाचपुते, गौरी शुगरचे चेअरमन बाबुराव बोत्रे, अरुण पाचपुते, बाळासाहेब महाडिक, मिलिंद दरेकर , सिद्धेश्वर देशमुख, सचिन कातोरे, गणेश झिटे, जिजाबापू शिंदे , बापूशेठ गोरे ,संग्राम घोडके ,अशोक खेंडके, सुनील वाळके, शहाजी खेतमाळीस,ॲड.महेश दरेकर, भाजपचे शहर अध्यक्ष राजेंद्र ऊकांडे,श्रीकांत मगर, यांच्यासह तालुक्यातील ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य सेवा संस्थेचे चेअरमन व संचालक यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या