Ticker

6/Breaking/ticker-posts

खा. सुप्रिया सुळे सोमवारी साधणार पाथर्डीकरांशी संवाद

 
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पाथर्डीः- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सौ.सुप्रियाताई सुळे या येत्या सोमवारी दि.09/10/2023 रोजी पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून संस्कार भवन येथे त्या नागरीकांशी परीसंवाद साधणार असल्याची माहीती राष्ट्रवादी महीला काँग्रेसच्या जिल्हाअध्यक्ष सौ.योगीताताई राजळे यांनी दिली.

         राष्ट्रवादीचे नेते ॲड.प्रतापराव ढाकणे व आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष प्रयत्नातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील बदललेल्या राजकीय परीस्थिती बाबत सौ.सुप्रिया सुळे या महाराष्ट्र भर दौरा करत आहेत.नगर जिल्हात प्रथमच या पार्श्वभूमीवर येत असून त्या पाथर्डी येथे व्यापारी,कार्यकर्ते,सामाजिक व राजकीय विविध घटकांतील प्रतोमद्वारे परीसंवाद साधणार आहेत.राजकीय परीस्थिती बाबत जनतेच्यामनात असलेला संताप व रोष व्यक्त करुन दिले देण्यासाठी व्यासपिठ उपलद्ध करुण दिले जाणार आसून त्यासाठी ॲड.प्रतापराव ढाकणे व आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पुढाकार घेतला असून या कार्यक्रमासाठी माजी जि.प.सदस्या प्रभावती ढाकणे,आरती निऱ्हाळी,सविता भापकर,ज्योती जेधे,रत्नमाला उदमले,तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,महारुद्र किर्तने,योगेश रासने देवा पवार,उज्वला शिरसाट,आदींना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या