केवळ माफी मागून फौजदारी कारवाईतून सुटका नाही
गैरवापर करणाऱ्या आमदाराला कारवाईला सामोरे जाण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई : सोशल मीडियावर असभ्य आणि अपमानास्पद पोस्ट टाकणाऱ्यांना शिक्षा होणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सोशल मीडियावर असभ्य आणि अपमानास्पद पोस्ट टाकणाऱ्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे. असे लोक माफी मागून फौजदारी कारवाईतून सुटू शकत नाहीत. त्यांना त्यांच्या कृत्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, अशाच एका प्रकरणी शुक्रवारी म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी ही टिप्पणी करताना सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूचे अभिनेते आणि माजी आमदार एसव्ही शेखर यांना हिसका दाखविला. आ. एसव्ही शेखर यांनी फेसबुकवर महिला पत्रकारांना लक्ष्य करत आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यांच्या या पोस्टनंतर बराच वाद झाला होता. शेखरने नंतर माफी मागितली आणि पोस्ट डिलीट देखील केली, परंतु या पोस्टबद्दल तामिळनाडूमध्ये त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते.
याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'शेखर यांनी पोस्टचा मजकूर न वाचता शेअर कसा केला? त्यानंतर या प्रकरणातील त्यांच्याविरुद्धच्या कारवाईत हस्तक्षेप करण्यास नकार दिला. न्यायालयाने कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास सांगितले. लोकांनी सोशल मीडियाचा वापर करताना खूप लक्ष दिले पाहिजे. सोशल मीडियाचा वापर गरजेचा नाही, पण जर कोणी केला तर आणि त्याची चूक झाली तर त्याची जबाबदारी घेऊन होणारा परिणाम सहन करायला तयार राहायला हवे., असे ठणकावले आहे.
व्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली सध्या सोशल मीडिया बेलगाम सुटला आहे. स्वैर आणि वाट्टेल ताशा पोस्ट टाकल्या जात असल्याच्या प्रकाराला न्यायालयाच्या या आदेशामुळे चांगलाच चाप लागणार आहे.
0 टिप्पण्या