Ticker

6/Breaking/ticker-posts

प. पू. दादाजी वैशंपायन यांचा दानधर्माचा वसा कुटुंबाने पुढे चालवला : फुलचंद रोकडे

 श्रावण मासानिमित्त वैशंपायन कुटुंबातर्फे २३ दत्तभक्त महिलांना साडी चोळीचे वाटप
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

शेवगाव : अष्टांग योग तज्ज्ञ प.पू.दादाजी वैशंपायन यांनी ॐ आनंद...दत्त सांप्रदायिक साधक समूहाच्या कल्याणासाठी अवघे आयुष्य वेचले तसेच दानधर्मही केला, तोच वसा त्यांच्या कुटुंबाने नेटाने पुढे चालविला आहे,असे प्रतिपादन शेवगावच्या गुरुदत्त सामाजिक संस्थेचे सचिव फुलचंद रोकडे यांनी केले.    ज्येष्ठ साधक शरद वैशंपायन व सौ.ललिता वैशंपायन यांनी अधिक मासाची सांगता तसेच श्रावण मासाच्या पर्वणीचे औचित्य साधून वैशंपायन नगरमधील श्रीदत्त देवस्थानातील २३ दत्तभक्त महिलांना सौ.गीता बाहेती यांच्या हस्ते साडी चोळीचे वाटप करण्यात आले,त्यावेळी ते बोलत होते.

     


 

 शुभांगी गोसावी, छाया पवार, शोभा लांडे, राजश्री मुरदारे ,भक्ती जोगळेकर, दीपा शेजुळ, उज्वला डोंब, सिंधू मुरदारे, रोहिणी गुजर, सुनिता धायतडक, सुनिता लांडे, सीमा कातकडे, पल्लवी कोरडे, गंगा भालसिंग, गिता बाहेती, जयश्री काळे, मंगल नेहूल, प्रीती शेजुळ, सुनंदा शिंपी, विद्या जाधव, किरण बिहाणी,सुनीता गाढे,आशा पाखरे, प्रमिला डहाळे आदी महिला दत्तभक्तांचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला.

        दत्तभक्त सुभाष गोलांडे,संजय कुलकर्णी,योगेश रोकडे,अशोक मुरदारे, कृष्णमुरारी गाढे, निलेश रोकडे, प्रा. डॉ. काकासाहेब लांडे, योगेश तायडे, अभय पालवे, वैभव भोर, प्रशांत गोसावी,शेखर रोकडे आदी यावेळी उपस्थित होते. जगन्नाथ गोसावी यांनी प्रास्ताविक केले. तर,मनेष माहिती यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या