Ticker

6/Breaking/ticker-posts

‘आठवणींचा डोह’ ला राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार जाहिर

 संमेलनाध्यक्ष  डॉ. रवींद्र शोभणे यांच्या शुभहस्ते लातूर येथे लवकरच पुरस्काराचे वितरणलोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)  

नगर  – लातूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीच्या वतीने ‘आठवणींचा डोह’ या सुनील गोसावी यांच्या आत्मचरित्र ग्रंथास सन 2022 चा राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार जाहीर झाला असून 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे यांच्या शुभहस्ते लातूर येथे लवकरच पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे’. अशी माहिती अकॅडमीचे सचिव प्रकाश धादगिने यांनी दिली.      डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरावर सर्व प्रकारातील ग्रंथांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येत असून यामध्ये सन 2022 च्या पुरस्कारां मध्ये सुनील गोसावी यांनी कोरोना काळात लिहिलेल्या ‘आठवणींचा डोह’ या ग्रंथाची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे.या ग्रंथात त्यांनी विविध सामाजिक,साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील आपल्या समवेत घडलेल्या घटना,घडामोडी बद्दल विविध लेख लिहून त्याचाच आत्मचरित्रपर ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र, शाल,पुप्षगुच्छ व रोख रक्कम रुपये १०००/- असे पुरस्कारचे स्वरूप आहे.


डॉ.रवींद्र शोभणे, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशटवार,उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजकुमार म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सदर कार्यक्रम होणार असल्याची माहिती अकेडमी चे अध्यक्ष अड्ड.एस.एन.बोड्के यांनी दिली. 

     ‘आठवणींचा डोह’ या ग्रंथास हा सहावा पुरस्कार असून पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक, आमदार,कविवर्य लहू कानडे, प्राचार्य शिवाजीराव देवढे, प्राचार्य जी.पी.ढाकणे, प्रा.डॉ.शंकर चव्हाण,प्राचार्य चंद्रकांत भोसले, प्रमोद देशपांडे, ज्ञानदेव पांडूळे, बापूसाहेब भोसले, ॲड. सुभाष लांडे पाटील, कविवर्य चंद्रकांत पालवे, प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये,शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या