Ticker

6/Breaking/ticker-posts

श्रीक्षेत्र वरूरला भव्य पालखी सोहळा ; कालावाटप

 कालावाटप, महाप्रसादाने आषाढी उत्सवाची सांगतालोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)  

     शेवगाव : ' धाकटी पंढरी ' अशी ख्याती असलेल्या श्रीक्षेत्र वरुर येथे गुरुपौर्णिमेला भव्य दिव्य पालखी सोहळा व काला वाटपाने आषाढी एकादशी उत्सवाची सांगता झाली.सकाळी श्रीविठ्ठल - रुक्मिणीच्या स्वयंभू वालुकमय मूर्तीला मंत्रघोषात अभिषेक घालण्यात आला.

       दुपारी विठ्ठल मंदिरात देवस्थानचे अध्यक्ष दिनकर महाराज अंचवले यांचे काल्याचे किर्तन व दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला.त्यानंतर टाळ - मृदंगाच्या निनादात पालखी सोहळा त्रिवेणी संगमाकडे मार्गस्थ झाला. साडेतीनशे वर्षापासून वंशपरंपरेने पालखीला खांद्या देण्याचा मान खांबट पाटील घराण्याकडे आहे.मारुती मंदिरासमोर ग्रामस्थ तसेच अभिनव फाउंडेशनचे सचिन म्हस्के यांचे वतीने काला वाटप झाले.     सायंकाळी त्रिवेणी संगमावरुन    पालखी परतल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.सलग ३७ वर्षे पंढरीची नेमाने वारी करणाऱ्या आखेगावच्या जोग महाराज सेवा संस्थांनचे महंत वैराग्यमूर्ती राम महाराज झिंजुर्के यांचे भक्त समूहाच्या वतीने भागवताचार्य दिनकर महाराज अंचवले यांचे उपस्थितीत गुरुपूजन करण्यात आले. रात्रभर हरी जागर, भारुडाचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.बादशाह शेख यांचे वतीने विठ्ठल मंदिरात वर्षभर पंगत भोजन देणाऱ्यांचा तसेच दिंडी चालकांचा पेढे प्रसाद व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या