Ticker

6/Breaking/ticker-posts

शाळेसाठी मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्यात ग्रामस्थांचा पुढाकार आनंदाची बाब -हभप . नारायण स्वामी

 

भगवान विद्यालयात  कालिका क्लॉथ च्या वतीने विद्युतीकरण 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


पाथर्डी (खरवंडी कासार):-

शाळेत विद्यार्थी विद्याग्रहन  करत  असताना  विद्यार्थाना  शाळेत मुलभुत सुविधा मिळणे हि महत्वाचे असते विद्याग्रहन करताना त्या ठिकाण चा परिसर भौतीक दृष्टया प्रसन्न  असेल तर मुले आनंदात शिक्षण घेतात व त्या शाळेतील विद्यार्थाची गुणवत्ता ही प्रकाशाप्रमाणे झळाली  देते असे प्रतिपादन भगवान गडाचे प्रधान आचार्य तथा भगवान विद्यालयाचे स्कुल कमेटी सदस्य हभप नारायण स्वामी यांनी केले.  खरवंडी कासार येथिल कालिका क्लॉथ स्टोअर चे सचांलक निलेश अंदुरे यांनी  भगवान विद्यालयाच्या सर्व इमारतीचे  विद्युतीकरण स्वखर्चाने करून दिले आहे त्यांचे उदघाटन हभप नारायण स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय कमेटी सदस्य पाडुंरंग आधंळे भास्करराव खेडकर सरपंच प्रदीप पाटील मुख्याध्यापक जिके भालेराव निलेश अंदुरे प्रमोद अंदुरे पर्यवक्षक वसंत खेडकर उपस्थित होते 

यावेळी ह भ प नारायण स्वामी म्हणाले की ज्ञान दान करणे हे शिक्षकाचे काम आहे ते काम ते करत असतात शिक्षण मंदीरात प्रसन्न वातावरण असावे म्हणुन या भागातील शिक्षण प्रेमी ग्रामस्थ शाळेला देणगी देत येथे मुलभुत सुविधा देत आहेत हि आनंदाची बाब आहे . या शाळेच्या सर्व इमारतीचे विद्युतिकरण करुण शाळेची  वास्तु प्रकाशमय करण्यासाठी देणगी दिलेल्या निलेश अंदुरे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला 

तसेच या शाळेच्या समिती मध्ये शिक्षक प्रतिनिधी म्हणुन नारायण शिरसाठ यांची निवड झाल्याने त्यांचा ही सत्कार करण्यात आला

यावेळी उपस्थित शालेय कमेटी सदस्य पाडुरंग आंधळे भास्करराव खेडकर  यांनी वर्गात जाऊन  शालेय विद्यार्थाशी संवाद साधला शिक्षक शिकवतात का शिकवलेले समजते का असे प्रश्ण विचारले विदयार्थानी होकारर्थी उत्तरे दिल्याने उपस्थिता नी आनंद व्यक्त केला 

खरवंडी कासार : भगवान विद्यालयातील इमारतीच्या नवीन  विद्युतीकरणाचे उद्घाटन करताना हभप नारायण स्वामी शालेय कमेटी सदस्य पाडुरंग आंधळे भास्करराव खेडकर  निलेश अंदुरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या