Ticker

6/Breaking/ticker-posts

खळबळजनक : अल्पवयीन मुलीचा संश यास्पद मृत्यू ; दांपत्यास ठोकल्या बेड्या; एजंट मात्र फरार

  






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

संगमनेर :-संगमनेर तालुक्यातील पठार भागात साकुर परिसरातील शिंदोडी गावात मेंढ्याचा सांभाळ करन्यासह मुख्यत: वेठबिगारीसाठी आणलेल्या नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा  संशयास्पद मृत्यू   प्रकरणी घारगाव पोलिसात शिंदोडी येथील पती-पत्नीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी या दांपत्याला बेड्या ठोकल्या आहेत.  त्यामुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची  शक्यता  निर्माण झाली आहे. 

    नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातून काही अल्पवयीन मुले मुली संगमनेर तालुक्यासह साकुर जवळील शिंदोडी आणि  डिग्रस परिसरात आणून त्यांचा शारीरिक  छळ करत त्या मुलांकडून मेंढ्या चारण्याचे काम करून घेत होते. नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील सहा ते सात मुले गायब झाले अस ल्याची खळबळजनक बाब नुकतीच उघडकीस आली आहे.

   याबाबत   अधिक माहिती अशी की नाशिक जिल्ह्याच्या  इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथील  कटकडे वस्तीमधील तुळसाबई सुरेश आगीवले यांनी तीन वर्षांपूर्वी आपली मुलगी गौरी (वय १० वर्ष) हिला घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे संगमनेर तालुक्यातील साकुर जवळ शिंदोडी येथील रहिवाशी असणारा मेंढपाळ विकास सीताराम कुदनर याच्याकडे मेंढ्या चारण्यासाठी तीन हजार रुपयांच्या मोबदल्या मध्ये पाठवले होते. संशयिताने काही दिवस त्या मुलीला चांगले सांभाळत असल्याचे भासवले. 


दरम्यानच्या काळात ती बेशुद्ध पडली होती, त्यामुळे कुदनर व त्याच्या साथीदारांनी गौरी हिस उभाडे येथील आगीवले कुटुंबीयांच्या झोपडी वजा राहत्या घराजवळ विकास  टाकून पलायन केले. आपल्या घराजवळकोण झोपले आहे हे पाहण्यासाठी तुळसाबाई गेल्या असता त्यांना आपलीच मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यामुळे  त्यांनी हंबरडा फोडला. गौरी हिची तब्येत गंभीर असल्याने  तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखलकेले. मात्र सात दिवस जीवन मरणाच्या उंबरठ्यावर असलेली गौरी हीचा अखेर उपचारा दरम्यान  मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

       याबाबत नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथील रहिवासी असणाऱ्या तुळसाबाई सुरेश आगिविले यांचे जबाबनुसार घारगाव पोलिसांत विकास सीताराम कुदनर व त्याची पत्नी सुमन विकास कुदनर या पती-पत्नीच्या विरोधात खुणाचा गुन्हा दाखल करून  पोलि सांनी त्या दोघांनाही अटक केली आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य एजंट  फरार झाला आहे. याबाबत अधिक तपास संगमनेर उपविभागाचे पोलीस अधीक्षक राहुल मदने यांच्या मार्ग दर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पाटील हे करीत आहेत.


जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक अहमदनगर यांच्या सुचनेनुसार साकुर येथील ग्रामसचिवालयात परिसरातील मेंढपाळांची तहसीलदार अमोल निकम यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी परिसरातील सर्व मेंढपाळांना निर्देश देण्यात आले आहे. तसेच सर्व मेंढपाळांना घडलेल्या घटनेची व वेठबिगारी कायद्याची माहिती तहसीलदार निकम यांनी दिली. जर वेठबिगारी लहान मुले कुठे आढळून आली तर प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या