Ticker

6/Breaking/ticker-posts

पाथर्डीत आरोग्याची ऐसी - तैसी ..! रस्ते उखाडले मात्र स्पिड ब्रेकरचा अट्टाहास ...

 






लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क

पाथर्डी : -शहरामध्ये आरोग्याची पार ऐसी - तैसी झाली असून बहुतांश ठिकाणी निकृष्ट कामामुळे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत , पेव्हर ब्लॉक ऊखडलेले अाहेत,या रस्त्यावरून वाहने चालवणेच मुश्किल झाले असताना गल्लीबोळातील याच रस्त्यावर काही ठिकाणी गरज नसतानाही अतिरिक्त स्पीड ब्रेकर टाकुन जनतेचा पैसा वाया घालवण्याचा उद्योग  सुरु असल्याचा आरोप ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांनी केला आहे .


प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात जिरेसाळ  यांनी म्हटले आहे की , शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे ते दुरुस्त करायचे सोडून ठेकेदाराच्या माध्यमातून अापले ऊखळ पांढरे करण्याचे उद्योग सद्यश हरामध्ये चालु आहे.रस्ता चांगला व वाहतुक जास्त अाहे अथवा ज्या ठिकाणी गरज आहे अशाच ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्यात यावेत. 


तसेच आरोग्याच्या विषयावर गेले सहा वर्षे झाली मनसेच्या माध्यमातून अाम्ही मागणी करत अाहोत की, एवढ्या मोठ्या पाथर्डी शहरात गरजेच्या ठिकाणी महिलांसाठी एकही साधी सार्वजनिक मुतारीची व्यवस्था नाही . संपुर्ण शहरात पुरुषांसाठी बाजार तळाच्या प्रवेशद्वारावर अवघी एक सार्वजनिक मुतारी अाहे ,तीचीही अवस्था घान व गचाळ स्वरुपाची झाली आहे, नगरपरिषदेत सर्वात जास्त महिला नगरसेवक अाहेत, तरीही महिलांची ही नाजुक अडचण सोडवण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही.


गरज नसताना फुटलेल्या पेव्हर ब्लॉक वर स्पीड ब्रेकर बसवुन शहरवासीयांता पैसा वाया घालवायचा कार्यक्रम चालू आहे... अगोदर महिला व पुरुषांसाठी शहरात सार्वजनिक मुतारीची व्यवस्था करा, ते महत्त्वाचे आहे,मग तुमचा धंदा चालू द्या नाहीतर तीव्र आंदोलनाचा माग अवलंबवा लागेल असा इशाराही जिरेसाळ यांनी दिला आहे .



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या